बांग्लादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतातून मायदेशी परतण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यांनी 16 डिसेंबरला बांगलादेशात परतण्याची घोषणा केलीय. त्यासाठी त्यांनी दिल्लीतून बांगलादेशच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या म्हणजेच बिमान बांगलादेश एअरलाईन्स विमानाची मागणी केलीय. बांगलादेशातील वाढता राजकीय आणि कायदेशीर तणाव पाहता, त्यांनी परतण्यासाठी निश्चित तारीख जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेख हसीना यांनी 16 डिसेंबरचीच तारीख का निवडलीय ते देखील आपण पाहूयात
16 डिसेंबर हा दिवस बांगलादेशात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971 मध्ये पाकिस्तानपासून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. माजी पंतप्रधान 16 डिसेंबरला ढाका इथं परततील, आवामी लीगचे प्रवक्ते सय्यद मुझम्मेल अली यांचा दावा. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात झालेल्या हिंसक उठावानंतर,शेख हसीना बांग्लादेश सोडून गेल्या होत्या. दोन वर्षांहून अधिक काळानंतर पुन्हा मायदेशी परतणार
माजी पंतप्रधान शेख हसीना मायदेशी परतणार असल्यानं बांगलादेशातील राजकीय वातावरण स्फोटक बनलंय. बांग्लादेश सरकारनं शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाला देशात कधीही राजकारण करू दिले जाणार नाही, असा कडक इशारा दिलाय. याला प्रत्युत्तर म्हणून आवामी लीगने शेख हसीना यांच्या समर्थनात 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लॉकडाऊन पुकारण्याची घोषणा केलीय.. आंदोलनासाठी आवामी लीगचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं राजधानी ढाका येथे एकत्र येत आहेत. तर हिंसाचार रोखण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलीय. त्यामुळे येत्या काही दिवसांत बांग्लादेशचं राजकारण पुन्हा ढवळून निघणार हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.