Mumbai : मुंबईत धक्कादायक घटना! रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग; आरोपीला अटक

Mumbai Andheri Crime News : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी २२ वर्षीय आरोपीला अटक. तब्बल १०० CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.
Mumbai Andheri Crime News
Mumbai Andheri Crime News AI Image
Published On: 

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बुकिंग हॉल परिसरात एका आरोपीने महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजून ५८ मिनिटांनी ही घटना घडली. पीडित महिला मोबाईलवर बोलत रेल्वे स्थानक परिसरातून पायी जात होती. यावेळी एका तरुणाने तिचा पाठलाग केला आणि तिच्या अंगाला हात लावून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर महिलेने रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Mumbai Andheri Crime News
Shirdi Vande Bharat : रेल्वेचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस 'या' स्थानकावरही थांबणार, कोणाला होणार फायदा?

महिलेच्या तक्रारीनंतर अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २९३/२०२६ दाखल असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ७५(२) आणि ७८(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

Mumbai Andheri Crime News
Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ; १ तोळ्याची किंमत काय? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले परिसरातील जवळपास १०० CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या तपासादरम्यान आरोपी जोगेश्वरी पूर्व परिसरातून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती देणाऱ्यांच्या मदतीने आरोपीचा पत्ता शोधून काढला आणि त्याला ताब्यात घेतले. उबेद साईद कुरेशी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.