Shocking : भांग प्यायला, बेभान होऊन नाचला अन् अचानक कोसळला; २५ वर्षीय प्राध्यपकाचा दुर्दैवी मृत्यू

Madhya Pradesh Bhopal Professor Death News : भोपाळमध्ये होळीच्या सणादरम्यान दुर्दैवी घटना घडली. एका तरुण प्राध्यापकाने भांगेच्या गोळ्या मिसळलेले दूध पिल्यानंतर नाचताना अचानक कोसळून मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Shocking : भांग प्यायला, बेभान होऊन नाचला अन् अचानक कोसळला; २५ वर्षीय प्राध्यपकाचा दुर्दैवी मृत्यू
Madhya Pradesh Bhopal Professor Death NewsSaam Tv
Published On
Summary
  • भोपाळमध्ये होळीच्या दिवशी दुर्दैवी घटना

  • प्राध्यापकाला भांग जास्त झाल्याने हृद्यविकाराचा झटका

  • रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले

  • आकस्मिक मृत्यूची नोंद

Madhya Pradesh Bhopal Professor Death By Heart Attack होळीचा सण नुकताच पार पडला. मात्र मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सणाला गालबोट लागलं असल्याची बातमी समोर आली. एका प्राध्यपकाने दुधात भांगेच्या अतिरिक्त गोळ्या मिसळून प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी एक लिटर दुधात सहा गोळ्या मिसळल्या होत्या. ते पिल्यानंतर लोकांसोबत नाचत होता. अचानक नाचताना खाली कोसळले आणि जागीच मृत झाले. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना भोपाळच्या ऐशबाग परिसरात ही घटना घडली . तसेच मृत प्राध्यापकाचे नाव कृष्णा नायक ( वय २५) आहे. नायक एका खाजगी महाविद्यालयात प्राध्यापक होते. होळीच्या दिवशी नायक यांनी मित्रांसोबत होळी खेळली. यादरम्यान त्यांनी एक लिटर दुधात सहा गोळ्या मिसळून प्यायले आणि नाचू लागले.

Shocking : भांग प्यायला, बेभान होऊन नाचला अन् अचानक कोसळला; २५ वर्षीय प्राध्यपकाचा दुर्दैवी मृत्यू
Railway News : वेळ संपली, काम बंद! ड्युटी संपल्यानंतर लोको पायलटने ट्रेन थांबवली अन् निघून गेला, ३ तास प्रवाशांचा खोळंबा

थोड्या वेळानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते जमिनीवर कोसळले. मित्रांनी कृष्णा यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच कृष्णा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला . गुरुवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला. तसेच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com