Russia-Ukraine War Saam Tv
देश विदेश

Russia-Ukraine War: रशिया- युक्रेनमधील युद्ध संपेना! पुन्हा ड्रोन हल्ला, शॉपिंग मॉल जमीनदोस्त

Russia Attacked Kharkiv By Missiles: रविवारी युक्रेनच्या ईशान्येकडील खार्किव शहरातील शॉपिंग मॉल आणि इव्हेंट कॉम्प्लेक्सवर रशियन क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात ५ मुलांसह ४७ जण जखमी झाले.

Priya More

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपायचे नाव घेत नाहीये. या दोन्ही देशांमध्ये पुन्हा हल्ले सुरू झाले आहेत. दोन्ही बाजूंनी हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी युक्रेनच्या ईशान्येकडील खार्किव शहरातील शॉपिंग मॉल आणि इव्हेंट कॉम्प्लेक्सवर रशियन क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात ५ मुलांसह ४७ जण जखमी झाले. याआधी रशियावर युक्रेनने केलेल्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यात १५० पेक्षा जास्त युक्रेनियन ड्रोन पाडले असल्याचे सांगितले होते.

कीवने अद्याप ड्रोन हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. युक्रेनने पॉवर प्लांट्स आणि तेल शुद्धीकरण केंद्राला लक्ष्य केल्याचे रशियाने म्हटले आहे. खार्किवमधील हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आपल्या सहयोगी देशांकडे विनंती केली की कीवला पाश्चात्य देशांनी पुरवलेली क्षेपणास्त्रे शत्रूंच्या क्षेत्रामध्ये टाकण्याची परवानगी दिली. जेणेकरून रशियाचे सैन्य आणखी धोका कमी करू शकतील.

रशिया-युक्रेन युद्ध आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. अडीच वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष आणखी वाढला आहे. रशिया पूर्व युक्रेनमध्ये आक्रमक पवित्रा घेत असून, ६ ऑगस्ट रोजी अचानक रशियन सीमेत घुसलेल्या युक्रेनच्या सैन्याला हुसकावून लावण्याचाही प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर युद्धातील सर्वात प्राणघातक हवाई हल्ले केले आणि ऊर्जा सुविधांसह अनेक लक्ष्यांवर हल्ला केला.

मॉस्कोने नागरिकांना लक्ष्य केल्याच्या गोष्टीला नकार दिला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेनमधील संघर्ष सुरू झाल्यापासून त्याच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेन, जेथे देशांतर्गत ड्रोन उद्योग वेगाने विस्तारत आहे. त्याने रशियन ऊर्जा, लष्करी आणि वाहतूक पायाभूत सुविधांवर हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेन सध्या मित्र राष्ट्रांवर दबाव आणत आहे. कीव युनायटेड स्टेट्स आणि इतर मित्र राष्ट्रांवर युक्रेन दबाव आणत आहे की रशियाच्या आत जास्त नुकसान करण्यासाठी आणि मॉस्कोच्या युक्रेनवर हल्ला करण्याच्या क्षमतेवर प्रत्युत्तर देण्यासाठी अधिक शक्तिशाली पाश्चात्य शस्त्रांचा वापर करण्यास परवानगी द्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA Seat Sharing : महाराष्ट्रात मोठा भाऊ काँग्रेस, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा मिळाल्या?

Maharashtra Election: पुण्यात आधी खोके सापडले, आता पेट्या; नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त, पोलिसांची धडक कारवाई

Maharashtra Election : शेकापचे ५ उमेदवार जाहीर, 'मविआ'बद्दलच्या चर्चांना पूर्णविराम, जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

Maharashtra Election : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? कोणतं सरकार चांगलं? सकाळ-CSDCचं सर्वेक्षण वाचा क्लिकवर

Winter Places: थंडगार हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांचे सौंदर्य फुलतं, नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT