Ukraine Drone Attack: युक्रेनचा रशियात 9/11 सारखा हल्ला; युक्रेनचं ड्रोन रशियाच्या बिल्डिंगमध्ये घुसलं

Russia Ukraine News: 2 वर्षांपासून सुरु असलेलं रशिया युक्रेन युद्ध आणखी विध्वंसक झालंय. युक्रेननं रशियाच्या सर्वात मोठ्या इमारतीला लक्ष करत 9/11 पेक्षा भीषण हल्ला केलाय.
युक्रेनचा रशियात 9/11 सारखा हल्ला; युक्रेनचं ड्रोन रशियाच्या बिल्डिंगमध्ये घुसलं
Ukraine Drone AttackSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

रशियाने दररोज हल्ले करून युक्रेनची मुस्कटदाबी केलीय. आता याला उत्तर देण्यासाठी युक्रेननं थेट रशियात ड्रोन आणि मिसाईलने अमेरिकेतील 9/11 सारखाच भीषण हल्ला केलाय.

रशियामधील सेराटोव्हमधील 38 मजली इमारतीवर युक्रेननं ड्रोन घुसवलंय. त्यामुळे रशियात दहशत पसरलीय...याशिवाय एंगेलस शहरातही इमारतीला ड्रोननं धडक दिलीय.. तर या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गव्हर्नरने दिलीय.

युक्रेनचा रशियात 9/11 सारखा हल्ला; युक्रेनचं ड्रोन रशियाच्या बिल्डिंगमध्ये घुसलं
Maharashtra Politics: सोलापूरात महायुतीला खिंडार पडणार? अनेक बडे नेते शरद पवार गटात करणार प्रवेश?

2 वर्षापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरूय. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर मोठे हल्ले करत विध्वंस केला. मात्र आता युक्रेननं रशियावर प्रतिहल्ले चढवलेत. आता तर थेट रशियात घुसून युक्रेननं 9/11 पेक्षा भीषण हल्ला केलाय. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान मोदींनी आधी रशिया आणि त्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेत वाद शांततेने सोडवण्याची विनंती केली होती.

युक्रेनचा रशियात 9/11 सारखा हल्ला; युक्रेनचं ड्रोन रशियाच्या बिल्डिंगमध्ये घुसलं
Mumbai Goa Highway: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार, मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य

मात्र त्यानंतरही युक्रेननं रशियावर जोरदार हल्ला चढवलाय. त्यामुळे युक्रेनने केलेल्या हल्ल्यानंतर चवताळलेला रशिया जोरदार पलटवार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विध्वंस कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com