Maharashtra Politics: सोलापूरात महायुतीला खिंडार पडणार? अनेक बडे नेते शरद पवार गटात करणार प्रवेश?

Sharad Pawar On Mahayuti: शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला खिंडार पाडण्यासाठी डाव टाकल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. कोल्हापूर, साताऱ्यानंतर पवारांनी आता आपला मोर्चा सोलापूर जिल्ह्याकडे वळवलाय.
सोलापूरात महायुतीला खिंडार पडणार? अनेक बडे नेते शरद पवार गटात करणार प्रवेश?
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभेला दोन्ही जागा जिंकल्यानंतर पवारांनी सोलापूर जिल्ह्यात विधानसभेसाठी रणनीती आखायला सुरुवात केलीय. त्यातच महायुतीत जागा वाटपातील संभाव्य तिढा लक्षात घेऊन भाजप आणि अजितदादांच्या नेत्यांनी पवारांची भेट घेत फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय. त्यामुळे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पवार महायुतीला खिंडार पाडणार असल्याची चर्चा सुरू झालीय. कोणते नेते तुतारी फुंकण्याची शक्यता आहे, ते जाणून घेऊ....

महायुती नेते, फुंकणार तुतारी?

रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार, भाजप, सोलापूर

बबन शिंदे, आमदार, राष्ट्रवादी (AP), माढा

प्रशांत परिचारक, माजी आमदार, भाजप, पंढरपूर

अभिजीत पाटील, नेते, भाजप, पंढरपूर

सोलापूरात महायुतीला खिंडार पडणार? अनेक बडे नेते शरद पवार गटात करणार प्रवेश?
Assembly Election: काँग्रेस आणि ठाकरे गटात जागांवरून मतभेद, मुंबईतील तेढ दिल्लीचे वरिष्ठ नेते सोडवणार?

दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (AP), सांगोला

मदन भोसले, माजी आमदार, भाजप, सातारा

दीपक चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी (AP), फलटण,

हर्षवर्धन पाटील, नेते, भाजप, इंदापूर

बापू पठारे, नेते , भाजप, पुणे

2014 मध्ये भाजपने जिंकलेला बालेकिल्ला पून्हा जिंकण्यासाठी पवारांनी कोल्हापूरमध्ये पहिला डाव टाकला आणि घाटगेंना गळाला लावलं. त्यानंतर पवारांनी आपला मोर्चा पुणे, सातारा, सोलापूर आणि साताऱ्याकडे वळवल्याचं म्हटलं जातंय. तर अनेकजण आमच्याकडे इच्छूकांची वेटिंग असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय.

सोलापूरात महायुतीला खिंडार पडणार? अनेक बडे नेते शरद पवार गटात करणार प्रवेश?
Eknath Shinde : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ४५ किमी ताशी वेगानं...

2024 च्या लोकसभा निकालात महायुतीचा पराभव झाल्यामुळे आता विधानसभेपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते पून्हा पवारांच्या तंबूत माघारी जाणार असल्याची चर्चा आहे. अनेकांनी पवारांची भेट घेत तुतारी फुंकण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे जुन्या सहकाऱ्यांची नवी मोळी बांधून पवार महायुतीला धोबीपछाड देणार की महायुती डाव उलटवणार? हे विधानसभेच्या निकालातच स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com