Assembly Election: काँग्रेस आणि ठाकरे गटात जागांवरून मतभेद, मुंबईतील तेढ दिल्लीचे वरिष्ठ नेते सोडवणार?

Assembly Election MVA : महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. आघाडीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यासाठी मविआकडून बैठका सत्र सुरूय.
Assembly Election: काँग्रेस आणि ठाकरे गटात जागांवरून मतभेद, मुंबईतील तेढ दिल्लीचे वरिष्ठ नेते सोडवणार?
Assembly Election Mahavikas Aaghadi Quint
Published On

गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी

महाविकास आघाडीकडून जागा वाटपासंदर्भात बैठका सत्र सुरूय मात्र अजूनही जागावाटपावर मार्ग निघालेला नाहीये. मविआकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना किती जागा बैठकांचं सत्र सुरूय. मुंबईत जागांवरुन ठाकरे गट शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या जागांबाबत दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र या जागांवर कोणताच निर्णय झाला नाहीये. मुंबईतील जागांबाबत दिल्लीतील हायकमांड निर्णय घेणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलंय.

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात मुंबईत बैठक झाली. मात्र या बैठकीतही काही जागांवर घोड अडल्याने फॉर्म्युला न ठरताच बैठक संपली. या बैठकीत काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मतभेद झाल्याचं समोर आलं. मुंबईच्या काही जागांवर तिन्ही पक्ष तर काही जागांवर दोन पक्ष दावा करत आहेत. त्यामुळे अजूनही पुढील बैठकीमध्ये मुंबईतील जागा संदर्भात चर्चा होणार असल्याची माहतिी सुत्रांनी दिलीय. शिवसेना ठाकरे गट अजूनही 20 ते 22 जागांवर आग्रही आहे. तर त्यातील काही जागांवर काँग्रेस आग्रही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच ते सात जागांवर आपला दावा सांगितला आहे.

सुत्राच्या माहितीनुसार 2019 ला महाविकास आघाडीतील पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून इतर 16 जागांवर अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र काही जागांवर तिन्ही पक्षांनी तर काही जागांवर दोन पक्ष दावा केल्याने मुंबईतील जागांवर पेच निर्माण झालाय. त्यामुळे आजची बैठकी न फॉर्म्युला ठरवता संपवण्यात आलीय.

मुंबईतील वादात असलेल्या जागांचा निर्णय आता काँग्रेस हाय कमांड सोडवतील, अशी भूमिका राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षातील नेत्यांकडे मांडलीय. मुंबईतील प्राथमिक चर्चेनंतर अंतिम चर्चा दिल्लीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते करतील आणि ते आम्हाला मान्य असेल अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका स्पष्ट केलीय. तर मुंबईतील जागांबाबत कोणतीही अडचण येणार नाही. आगामी एक ते दोन बैठकांमध्ये मुंबईचा निर्णय पूर्ण होईल, असा महाविकास आघाडीतील नेत्यांना विश्वास असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

Assembly Election: काँग्रेस आणि ठाकरे गटात जागांवरून मतभेद, मुंबईतील तेढ दिल्लीचे वरिष्ठ नेते सोडवणार?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी खेळी; नाशिकमध्ये महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com