Nagpur News: बोगस मतदारांचा घोळ! महाविकास आघाडी अन् भाजपमध्ये रंगला सामना; नागपूरमध्ये राजकारण तापलं, प्रकरण काय?

Maharashtra Assembly Election 2024: हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार समिर मेघे यांच्या हिंगणा मतदारसंघात 60 हजात बोगस मतदार आणि 19 हजार मतदारांचे नाव डबल असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीकडून निवेदनातून कारवाईची मागणी केली आहे.
Nagpur News: बोगस मतदारांचा वाद! महाविकास आघाडी अन् भाजपमध्ये रंगला सामना; नागपूरमध्ये राजकारण तापलं, प्रकरण काय?
Maharashtra Assembly Election 2024: Saamtv
Published On

पराग ढोबळे, ता. २४ ऑगस्ट २०२४

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच विधानसभेपूर्वी नागपूरमध्ये बोगस मतदारांच्या मुद्द्यावरुन घोळ झाला असून महाविकास आघाडीसह भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर....

Nagpur News: बोगस मतदारांचा वाद! महाविकास आघाडी अन् भाजपमध्ये रंगला सामना; नागपूरमध्ये राजकारण तापलं, प्रकरण काय?
Maharashtra Politics: शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर! दिंडोशीमध्ये राडा; विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुखामध्ये तुफान हाणामारी

बोगस मतदारांवरुन राजकारण तापलं!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा निवडणूकीपूर्वी नागपूर जिल्ह्यात बोगस मतदारांमुळे महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूरच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार समिर मेघे यांच्या हिंगणा मतदारसंघात 60 हजात बोगस मतदार आणि 19 हजार मतदारांचे नाव डबल असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीकडून याबाबत निवेदनातून कारवाईची मागणी केली आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सामना!

त्यानंतर भाजपकडूनसुद्धा हिंगणा मतदारसंघाच्या यादीत असलेले नेते नागपुरात राहत असताना नाव हिंगणा मतदारसंघात असल्याचा आरोप आमदार समीर मेघे यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर भाजप बबलू गौतम आणि जिल्हा परिषद विरोधीपक्ष नेते अतिष उमरे यांनी उपविभागीय अधिकारी हिंगणा यांना निवेदन दिले आहे.

Nagpur News: बोगस मतदारांचा वाद! महाविकास आघाडी अन् भाजपमध्ये रंगला सामना; नागपूरमध्ये राजकारण तापलं, प्रकरण काय?
Maharashtra Rain: राज्यात पावसाचे दमदार कमबॅक! बुलढाणा, रत्नागिरीसह नाशिकच्या धरणक्षेत्रातही जोर वाढला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हा आरोप आताचा नाही तर 2019 पासून आरोप केला आहे. सत्यता बाहेर निघाली असल्याने अश्या पद्धतीने भाजपकडून आरोप होत आहेक. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते बालिशपणाचे आरोप करत आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी यांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बोगस मतदारांवरुन महाविकास आघाडी विरुद्ध माहायुती असा सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

Nagpur News: बोगस मतदारांचा वाद! महाविकास आघाडी अन् भाजपमध्ये रंगला सामना; नागपूरमध्ये राजकारण तापलं, प्रकरण काय?
Bhiwandi Crime: भिवंडीत अमानुष प्रकार; तीन वर्षीय चिमुरडीला दिले चटके,आश्रम संचालाकास अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com