Maharashtra Rain: राज्यात पावसाचे दमदार कमबॅक! बुलढाणा, रत्नागिरीसह नाशिकच्या धरणक्षेत्रातही जोर वाढला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Rain Saam TV

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे दमदार कमबॅक! बुलढाणा, रत्नागिरीसह नाशिकच्या धरणक्षेत्रातही जोर वाढला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain News Weather Update IMD Alert Update: आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. नाशिक, बुलढाणा, बीडसह, पुणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Published on

नाशिक, ता. २४ ऑगस्ट २०२४

आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. नाशिक, बुलढाणा, बीडसह, पुणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गोदावरी नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिकच्या धरण क्षेत्रात पाऊस वाढला

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला चांगलाच वाढला आहे. पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे दारणा धरणातून 2 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर गंगापूर धरणातून देखील 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कालपासून गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांतून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेडमध्येही अलर्ट!

मागील वीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले होते. मात्र नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्व दूर पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकाला जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तर नांदेड जिल्ह्यात 23 आणि 24 अशा दोन दिवस हवामान विभागाच्या वतीने येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे दमदार कमबॅक! बुलढाणा, रत्नागिरीसह नाशिकच्या धरणक्षेत्रातही जोर वाढला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Politics: शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर! दिंडोशीमध्ये राडा; विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुखामध्ये तुफान हाणामारी

बुलढाणा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला!

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाण्याच्या येळगाव, सागवान या परिसरात रात्री मुसळधार पाऊस झालाय, आणि त्यामुळे सागवान येथील पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे, पैनगंगा नदीला पूर आल्याने बुलढाणा शहरासह दहा ते बारा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील जलसाठ्यात वाढ होणार असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

रत्नागिरीत पावसाची बॅटिंग!

रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा क्षेत्र असल्याने त्याचा परिणाम कोकणात पुढील तीन दिवस जाणवणार आहे. त्यामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 26 ऑगस्टपर्यंत किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे दमदार कमबॅक! बुलढाणा, रत्नागिरीसह नाशिकच्या धरणक्षेत्रातही जोर वाढला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Nashik Crime : धक्कादायक! नाशिकमध्ये १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शिक्षक अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com