Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी खेळी; नाशिकमध्ये महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार

Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांनी डाव टाकला आहे.प्रकाश आंबेडकरांच्या खेळीने महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSaam TV
Published On

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीसाठी चाचपणी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी थेट माकपच्या जे.पी. गावीत यांना तिसऱ्या आघाडीसाठी ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या ऑफरमुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या दौऱ्यादरम्यान प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवणार वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी थेट माकपचे माजी आमदार जे पी गावित यांना तिसऱ्या आघाडीत सामील होण्याची ऑफर दिली आहे. 'जे पी गावीत यांनी आमच्यासोबत तिसऱ्या आघडीत यावे. माकपचे काँग्रेसशी लग्न झालं आहे, त्यांचा काडीमोड होण्याची वाट पाहू, असं वक्तव्य करून प्रकाश आंबेडकरांनी करून महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलं आहे.

Prakash Ambedkar
Nashik Flood : मंदिरं, पूल पाण्याखाली; नाशिकला पुढील ४८ तास पावसाचा ऑरेंज अलर्ट, पाहा VIDEO

आदिवासी समूहाच्या बजेटवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'आदिवासी समूहाचे बजेट 7.5 टक्के आहे. एकंदरित त्यांचे बजेट ७० हजार कोटी होतात. त्यातून दहा हजार कोटी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेवले पाहिजे. दुर्दैवाने सरकारला अदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणिव नाही. कंत्राटदार चालले पाहिजे, यासाठी डीबीटी बंद करत नाहीत. बोगस आदिवासी भरती आहे, असे विधानसभात सांगितले गेले. जे बोगस होते, त्यांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले. पण पात्र आदिवासींची पेसा अंतर्गत भरती केली नाही. नाशिकचे आदिवासी आयुक्तलय आंदोलनासाठी केंद्र करण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय केंद्र करा'.

लाडकी बहीण योजनेवरून आंबेडकरांचा सरकारवर निशाणा

लाडकी बहीण योजनेला कुठून पैसे आला? आदिवासीच्या बजेटचे ७ हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले का? असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Prakash Ambedkar
Nashik Accident: रात्रीच्या अंधारात थेट खड्ड्यात कोसळला; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, थरार CCTVत कैद

दादा भुसे यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

दादा भुसे म्हणाले, 'मला कळाले प्रकाश आंबेडकर आलेले आहेत. पाहुणे आल्यानंतर आपण स्वागत करतो. तसं तुमच्या सगळ्यांच्या समोर स्वागत केलं. मालेगावमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आहे. त्या कार्यक्रमाची आम्ही स्थानिक पातळीवरती पत्रिका निश्चित केली. त्यात त्यांची परवानगी न घेता फोटो टाकला आहे, अशी माहिती मी त्यांना दिली. त्यांचे आणि माझे स्नेहाचे संबंध आहेत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com