अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ 2008 च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आला. आतापर्यंत झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकदा तर शिवसेनेने दोनदा येथून विजय मिळवला आहे. 2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही शिवसेनेने आपला झेंडा फडकवला होता. अशातच 2024 पासून ही जागा शिवसेनेकडे आहे.
अंधेरी पूर्व ही जागा मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात येते. सध्या ऋतुजा रमेश लटके या येथून आमदार आहेत. ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाच्या आमदार आहेत. यातच महाविकास आघाडीकडून ही जागा पुन्हा एकदा ठाकरे गटासाठी सोडली जाऊ शकते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत रमेश लटके यांनी या जागेवर विजय मिळवला होता. निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार मूरजी पटेल यांचा 16,965 मतांनी पराभव केला होता. तर काँग्रेस उमेदवार अमीन जगदीश कुट्टी तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 27,951 मते मिळाली होती. याआधी 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांनी भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव केला होता. त्यावेळी ते 5,479 मतांनी विजयी झाले होते.
2022 मध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. यावेळी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने येथून आपला उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत ऋतुजा लटके एकूण 86570 मतांपैकी 66530 मते मिळवून विजय झाल्या.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवलेल्या मूरजी पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मतदारसांघातून दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळवली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप येथून त्यांना उमेदवारी देऊ शकतं. तसेच ठाकरे गटही पुन्हा एकदा ऋतुजा लटके यांच्यावर विश्वास दाखवू शकतं. भाजप आणि ठाकरे गट, या दोघांचंही येथे मोठे जनाधार असल्याने यंदाची ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.