Eknath Shinde : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ४५ किमी ताशी वेगानं...

CM Eknath Shinde on chhatrapati shivaji maharaj statue collapse : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
eknath shinde
CM Eknath ShindeYandex
Published On

मुंबई : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेवरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी पुतळा तयार करणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रियानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधुदुर्गातील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय तोडफोडीवरही भाष्य केलं.

eknath shinde
Vaibhav Naik: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, आमदार वैभव नाईक यांनी PWD कार्यालय फोडलं

शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'विरोधकांना टीका करायला वेळ आहे. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर झालेली घटना दुर्दैवी आहे. ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. शिवरायांचा हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्यांनीच डिझाइन केले होते. ४५ किमी ताशी वेगाने वाहणारा असा वारा होता. त्यात हे नुकसान झाले आहे'.

eknath shinde
Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, वर्षभरापूर्वी PM मोदींनी केलं होतं अनावरण

'उद्या त्या ठिकाणी नौदलाचे अधिकारी येणार आहे. तत्काळ आमचं आणि नौदलाचे अधिकारी तिथे पोहोचून महाराष्ट्राचा आराध्यदैवत असलेल्या महाराजांचा पुतळा लवकरच उभारू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. सिंधुदुर्गातील घटनेनंतर आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. 'वैभव नाईक त्यांच्या त्या भावना आहेत. पण कायदा हातात घ्यायचे काम नाही. शांतता सुव्यवस्था सर्वांनी राखावी, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

भाजपची घाई, इव्हेंटबाजी; खासदार अमोल कोल्हेंनी साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला हा भाजपची घाई, इव्हेंटबाजी,पंतप्रधान मोदींचा वेळ जुळवण्याचा प्रयत्न आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळला आहे. पंतप्रधान मोदींच्या व्यक्तीपूजेत तल्लीन असणाऱ्या भाजपने शिवरायांच्या बाबतीत अक्षम्य पाप केलं आहे, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारच निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com