Nepal Bus Accident : नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांना ५ लाखाची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव, तळवेल तसेच परिसरातील ८० भाविकांचा समूह देवदर्शनासाठी गेले होते.
Nepal Bus Accident
Nepal Bus AccidentSaam tv
Published On

जळगाव : नेपाळ येथील बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृत पडलेल्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जळगाव येथे आयोजित लखपती दीदी या कार्यक्रमात बोलत होते.

Nepal Bus Accident
Buldhana crime : मेहकर येथील सराफा दुकानात चोरी; १३ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वरणगाव, तळवेल तसेच परिसरातील ८० भाविकांचा समूह देवदर्शनासाठी गेले होते. या दरम्यान ते नेपाळ येथे गेले असता शुक्रवारी भाविकांच्या एका बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये (Accident) जिल्ह्यातील तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला. तर एक तरुणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असून तिचा शोध देखील सुरू आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

Nepal Bus Accident
Panjhara River : पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ; धुळे शहरातील पुलावरून नागरिकांना प्रवेश बंदी

प्रत्येकी पाच लाखाची मदत 

दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या नेपाळ येथील बस अपघातात मृत झालेल्याच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत केंद्र सरकारतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर राज्य सरकारने देखील मदत जाहीर केली आहे. (eknath shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावात आयोजित लखपती दीदी या कार्यक्रमानिमित्ताने आले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी नेपाळमधील बस अपघातामध्ये मृत व्यक्तींबद्दल शोक व्यक्त करत मृत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com