Dilawar Singh Babbar : कॅनडात भारतविरोधी मोहीम; माजी मुख्यमंत्र्यांचा हत्यारा दिलावरसिंग बब्बरला विहीली श्रद्धांजली

Dilawar Singh Babbar News : कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक कट्टरवादी गटांकडून भारतविरोधी मोहीस सुरू आहे. 1995 मध्ये व्हॅन्कुवरमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या हल्लेखोराला नुकताच श्रद्धांजली वाहण्यात आली.
Dilawar Singh Babbar
Dilawar Singh BabbarSaam Digital
Published On

कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक कट्टरवादी गटांकडून भारतविरोधी मोहीस सुरू आहे. 1995 मध्ये व्हॅन्कुवरमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या हल्लेखोराला नुकताच श्रद्धांजली वाहण्यात आली. व्हॅन्कुवरमध्ये काढलेल्या टेबलमध्ये हत्येचे ग्राफिक चित्रण होते. त्यात रक्ताने माखलेली कार आणि खून झालेल्या मुख्यमंत्र्यांची छायाचित्रेही प्रदर्शित करण्यात आली होती आणि त्यांच्या मारेकऱ्याचं वर्णन शहीद असं करण्यात आलं होतं.

Dilawar Singh Babbar
UP Crime News : महाराष्ट्र केडरच्या IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा वसतिगृहात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय?

बेअंतला बॉम्बस्फोट झाल्याची घोषणा असलेले पोस्टरही लावण्यात आले होते आणि या रॅलीदरम्यान आत्मघाती हल्लेखोर दिलावरसिंग बब्बरलाही श्रद्धांजली वाहण्यात आली. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची 31 ऑगस्ट 1995 रोजी हत्या झाली होती. यावेळी व्हॅन्कुवरमध्ये त्यांच्या मारेकऱ्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

याआधी टोरंटोमध्ये इंद्रजीत सिंह गोसल यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीतही खलिस्तान सार्वमताच्या समर्थकांना बब्बर सिंगची 'लेकरं' असं संबोधण्यात आलं होतं शिख फॉर जस्टिसचे जनरल समुपदेशक गुरपतवंत पन्नूनचा जवळचा साथीदार गोसल याला त्यांच्या जीवाला धोका असल्याची चेतावणी देण्यात आली होती. यासंदर्भात कॅनडाच्या पोलिसांनी इशारा दिला होता.

Dilawar Singh Babbar
Pune Crime News : १० बाय १० च्या घरासाठी सख्ख्या बहिणीची हत्या; शिर, हात-पाय कापून धड नदीत फेकलं

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस आणि ओंटारियो प्रांतीय पोलिसांनी यापूर्वी देखील चेतावणी जारी केली होती. गेल्या वर्षी 18 जून रोजी हरदीपसिंग निज्जरची ब्रिटिश कोलंबियामध्ये सार्वजनिकरित्या हत्या करण्यात आली होती. चंदीगडमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी प्रतिबंधित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलने घेतली होती.

9 जून रोजी, ग्रेटर टोरंटो एरियातील (GTA) ब्रॅम्प्टन येथील एका परेडमध्ये इंदिरा गांधींच्या पुतळ्याला त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या घालताना दाखवण्यात आलं होतं. त्याच्या हत्ये दिवशीच 31 ऑक्टोबर रोजी शिक्षा म्हणून दाखणल्यात आलं होतं. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या करण्यात आली होती. ऑपरेशन ब्लूस्टारच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त ही परेड आयोजित करण्यात आली होती.

व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर झालेल्या निषेधादरम्यान अशाच प्रकारच्या निदर्शनानंतर अवघ्या तीन दिवसांनी हा प्रकार घडला आहे. त्यावर कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री, डॉमिनिक लेब्लँक यांनी शुक्रवारी ट्विटरवर पोस् करून कॅनडात हिंसाचाराला कधीही प्रोत्साहन दिलं जाणार नाही, असं म्हटलं आहे.

Dilawar Singh Babbar
Sharad Pawar : 'लेक राज्याचा पहिला मुख्यमंत्री झाला अन् आईला माहीतही नाही...'; शरद पवारांनी सांगितला यशवंतराव चव्हाणांचा खास किस्सा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com