UP Crime News : महाराष्ट्र केडरच्या IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा वसतिगृहात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय?

UP Crime : राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी अनिका रस्तोगी मृतदेह वसतिगृहाच्या खोलीत आढळून आला. अनिका 1998 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी संजय रस्तोगी यांची मुलगी आहे. ते सध्या दिल्लीत राष्ट्रीय तपास संस्थेत आयजी आहेत.
UP Crime News
UP Crime News Saam Digital
Published On

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये शनिवारी रात्री 19 वर्षीय विद्यार्थिनी वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली. अनिका रस्तोगी असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी होती. अनिका तिच्या खोलीत जमिनीवर पडलेली आढळली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

UP Crime News
IVF Pregnancy : गर्भधारणेचं प्रमाण घटलं? इतक्या कोटी महिलांना लागते IVF ची गरज, रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

अनिका ही एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती आणि संजय रस्तोगी यांची मुलगी होती, 1998 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी. संजय रस्तोगी सध्या दिल्लीत राष्ट्रीय तपास संस्थेत आयजी म्हणून कार्यरत आहेत.

राम मनोहर लोहिया रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रात्री 10 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने अनिकाचा मृत्यू झाला आहे. "ही अत्यंत दुःखद बातमी आहे की विद्यार्थिनी अनिका रस्तोगीचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संपूर्ण विद्यापीठ तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.

UP Crime News
Sharad Pawar : 'लेक राज्याचा पहिला मुख्यमंत्री झाला अन् आईला माहीतही नाही...'; शरद पवारांनी सांगितला यशवंतराव चव्हाणांचा खास किस्सा!

अनिकाच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. वसतिगृहाची खोली आतून बंद होती आणि आत काहीही संशयास्पद आढळले नाही. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असून पीडितेच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

UP Crime News
Pune Crime News : १० बाय १० च्या घरासाठी सख्ख्या बहिणीची हत्या; शिर, हात-पाय कापून धड नदीत फेकलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com