रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात हैदराबादमधील एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. नोकरीच्या नावाखाली एका एजंटने या तरुणाची फसवणूक केली. त्याला नोकरी देण्याचं आमिष देत त्याला थेट रशियन सैन्यात भरती केले. त्यानंतर युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात त्याला पाठवण्यात आलं त्यात त्यांचा मृत्यू झाला. या तरुणाचं नाव असफान असून तो हैदराबाद येथील रहिवाशी होता. दरम्यान याआधी गुजरातमधील २३ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय.(Latest News)
भारतातील हैदराबाद शहरातील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय असफानचा रशिया-युक्रेन युद्धात मृत्यू झालाय. सुरक्षा सहाय्यकाची नोकरी असल्याचं सांगत असफानला रशियन सैन्यात भरती करण्यात आले होते. त्याची फसवणूक करत त्याला थेट युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धात पाठवलं होतं. युक्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झालेल्या तरुणाचं कुटुंब हैदराबाद येथे राहत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हा तरुण विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. आपला परिवार सोडून हा व्यक्ती नोकरीच्या शोधात रशियामध्ये गेला होता. त्यानंतर हैदराबादमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबियांनी असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर ओवैसी यांनी मॉस्कोमध्ये असललेल्या भारतीय दुतावासाशी संपर्क साधला होता. ओवैसी यांनी असफानविषयी त्यांना माहिती दिली.
त्यानंतर भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी असफान याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. दरम्यान असफानसह पंजाबमध्ये असललेल्या होशियापूर येथील सात मुले युक्रेन आणि रशियाच्या युद्धात अडकलेत. त्यांनी एक व्हिडिओ बनवून मदत मागितली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.