Us Presidential Election: राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून निक्की हेली बाहेर; ट्रम्प -बायडेनमध्ये थेट स्पर्धा

Us Presidential Election: अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक २०२४ पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडेन अशी होणार आहे. रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवार होण्याच्या शर्यतीत ट्रम्प यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी निक्की हेली यांनी आज आपले नाव मागे घेतले आहे.
Us Presidential Election
Us Presidential ElectionSaam Tv
Published On

Us Presidential Election Donald Trump Vs Joe Biden:

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेल्या भारतीय वंशाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांनी आता व्हाईट हाऊसच्या शर्यतीतून माघार घेतलीय. रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निक्की हेली यांनी आपला प्रचार थांबवला. (Latest News)

'सुपर ट्युजडे' रोजी 15 राज्यांच्या पक्ष प्राथमिक फेरीत पराभव झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय. हेली यांच्या या निर्णयामुळे रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकमेव प्रमुख उमेदवार राहतील. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची ट्रम्प यांच्याशी लढत राहणार आहे.

ट्रम्प सलग तिसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचा उमेदवार असणार आहेत. सुपर ट्यूजडेच्या प्रायमरीनंतर ट्रम्प यांनी त्यांच्याप्रतिस्पर्धी उमेदवार हेली यांच्यापेक्षा आघाडी घेतली होती. ट्रम्प यांनी वर्मोंट राज्यात मोठा विजय मिळवत हेली यांना बहुमत मिळवू दिलं नाही. दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर हेली म्हणाल्या की , "माझा प्रचार मोहीम थांबवण्याची वेळ आलीय. "मला अमेरिकन लोकांचा आवाज ऐकायला हवा आहे."आणि मी तेच केलं. मला काही खेद नाही. मी यापुढे उमेदवार राहणार नाही, परंतु ज्या गोष्टींवर माझा विश्वास आहे त्यासाठी मी माझा आवाज उठवत राहील.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

युनायटेड नेशन्समधील अमेरिकेच्या माजी राजदूत राहिलेल्या हेली, यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे ट्रम्प यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जात होत्या.

Us Presidential Election
America- Russsia: अमेरिका अन् रशियात शाब्दिक युद्ध; टीका करताना बायडन यांची पुतीन यांना शिवीगाळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com