Operation Sindoor Saam Tv
देश विदेश

Operation Sindoor: पहलगामचा बदला, मध्यरात्री पाकिस्तानची झोप उडवली; ऑपरेशन सिंदूर नक्की कसं केलं? १० मुद्द्यांमध्ये घ्या समजून

Operation Sindoor Against Pakistan: भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर केले आहे. पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांना उडवून दिले आहे.

Siddhi Hande

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवून ९ दहशतावदी तळ उडवून दिले आहे. ७ मे रोजी मध्यरात्री भारताने ही कारवाई केली आहे. संपूर्ण देश झोपेत असताना भारतीय सैन्याने ही कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्यापत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उडवून दिले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लष्कराला कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली होती.पंतप्रधान मोदींचीही या संपूर्ण घडामोंडीवर बारीक लक्ष होते. ऑपरेशन सिंदूर नक्की आहे तरी काय?हे समजून घेऊया.

१. टार्गेटेड मोहिम (Targeted Mission)

भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर केले. ज्यामध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्यापत जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. जिथून संपूर्ण दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केले होते. तेच दहशतवादी तळ उडवून दिले आहे.

२. ९ दहशतवादी तळांना लक्ष्य

भारताने या कारवाईत एकूण ९ दहशवतादी तळांना लक्ष्य केले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये बहावलपूर, मुरीदके ते चक आमरु या ठिकाणांचा समावेश आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरला आहे.

३.संयमाने शत्रूवर हल्ला

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले नाही. फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानला पुन्हा त्याची जागा दाखवून दिली आहे. याबाबत एका मीडिया हाऊसने माहिती दिली आहे.

४. जेएफ- 17 उडवले

भारताने ऑपरेशन सिंदूर करुन संपूर्ण देशाला चकित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानचे JF-17 विमानपाडले आहे.

५. तिन्ही सैन्यदलांचे एकत्रित ऑपरेशन

भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी एकत्र येऊन हे ऑपरेशन केले आहे. भारतीय आर्मी, नौदल आणि हवाई दलांनी अचून शस्त्रांचा वापर करुन ही कारवाई केली आहे. भारताने कामिकाझे ड्रोनचा वापर केला आहे.

६. पंतप्रधान मोदींचे लक्ष

आज होणाऱ्या मॉक ड्रिलवर पंतप्रधान मोदींनी लक्ष ठेवले होते. परंतु त्यापूर्वीच भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन मोठा धक्का दिला आहे. भारताच्या या कडक कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

७. संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारत माता की जय असं त्यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादमध्ये अंधार पसरला आहे.

8. जैशला मोठा धक्का

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेने जैश ए मोहम्मदला मोठा धक्का दिला आहे. भारतीय विमानांनी जैश ए मोहम्मदचा अड्डा उद्धवस्त केला आहे.

9. तीन नागरिक ठार

भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्यानेदेखील हल्ला केला. यात तीन नागरिक ठार झाले आहे. यामध्ये अंधाधुं गोळीबार करण्यात आला आहे. त्यामध्ये तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

10.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?

अमेरिकेनेही भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आम्हाला माहित होते काहीतरी मोठे घडणार आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकव्यापत जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट झाल्याचे स्पष्ट ऐकून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT