America: 'भारतीय चांगले अ‍ॅक्टर', रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींचं विधान

Russia Oil Row: अमेरिकेने पुन्हा एकदा भारताला रशियन तेल खरेदीवर सवलत देण्याबाबत एक निवेदन जारी केले. याबद्दल अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींनी मोठं विधान केले. 'भारतीय चांगले अ‍ॅक्टर', असल्याचे त्यांनी सांगितले.

रशियन तेल खरेदीवरून भारताला मिळालेल्या सवलतीनंतर आता अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींनी एक वक्तव्य केलंय. भारताने यापूर्वी अमेरिकेच्या विनंतीवरून रशियाकडून तेल खरेदी थांबवली होती. भारताच्या या सहकार्यामुळेच अमेरिकेने भारताचे वर्णन खूप चांगला अ‍ॅक्टर असा केला आहे. तर सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे अमेरिकेनं भारताला तेल खरेदीसाठी परवानगी दिलीय.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींनी पत्रकारांना सांगितले की, 'भारतातील आमच्या भागीदारांनी बजावलेल्या चांगल्या भूमिकेमुळे नवी दिल्लीला रशियन तेल खरेदीवर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी हे अल्पकालीन पाऊल असल्याचे वर्णन केले. ज्याचा उद्देश जागतिक तेल पुरवठा स्थिर ठेवणे आहे. त्यांनी पुढे हे देखील स्पष्ट केले की, यामुळे मॉस्कोला कोणतीही महत्त्वपूर्ण आर्थिक मदत मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com