Mock Drill: भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग अधिक गढद; देशात उद्या मॉक ड्रिल|VIDEO

First Time in 54 Years:भारतता तब्बल 54 वर्षानंतर मॉक ड्रिल होत आहे. याआधी 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या आधी असा सराव घेण्यात आला होता.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने भारताच्या तीनही सेना दलांनी तयारीही पूर्ण केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 मे रोजी मॉकड्रिल घेण्याचेआदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी हा मॉकड्रिल घेतला जाणार आहे.

मॉकड्रिल दरम्यान उपाययोजना

सायरनद्वारे हवाई हल्ल्याचा इशारा जारी केला जाईल. शत्रूच्या हल्ल्याच्या बाबतीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूवर सामान्य नागरिक आणि विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com