Viral Video: धक्कादायक अपघात कॅमेऱ्यात कैद! समोरून येणाऱ्या दोन बाईकस्वारांची एकमेकांना धडक, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Road accident viral video: सोशल मीडियावर भीषण दुचाकींचा अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेत बाइक आणि स्कूटरची समोरासमोर धडक झाली.
Road accident viral video
Road accident viral videoSAAM TV
Published On

सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच सध्या एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत एका बाइक आणि स्कूटरची समोरासमोर भीषण धडक झाल्याचं दिसतंय. या अपघातात ४४ वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागलाय. या अपघाताच्या वेळी दोन्ही स्कुटीस्वारांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं.

अपघाताचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा अपघात अगदी स्पष्टपणे दिसून येतो. रस्त्याच्या मध्यभागी एक स्कूटर उभी असल्याचं दिसतंय. त्याच वेळी समोरून एक स्कुटी वेगाने येताना दिसते. हेडलाईटचा प्रकाश आणि अचानक समोर आलेली स्कूटर यामुळे बाइकस्वाराला नियंत्रण ठेवता आलं नाही.

Road accident viral video
Viral Video: रॅपिडो रायडरच्या कृत्यानं मन जिंकलं, तरुणीचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

समोर उभी असलेली स्कुटी आणि नियंत्रण सुटल्याने दोन्ही स्कुटी एकमेंकावर धडकतात. ही धडक इतकी जोरदार असते की, दोन्ही स्कुटीस्वार रस्त्यावर फेकले जाताना दिसतात.

हेल्मेट नसल्याने जीव गमावला

या अपघातात पत्रकार एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. स्थानिक लोकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी दोन्ही स्कुटी चालकांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे स्कुटी चालवताना हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा हे समजतंय.

Road accident viral video
Russian model viral video: जवळ आला, हात लावण्याचा प्रयत्न केला आणि...! लगट करणाऱ्याला रशियन महिलेने शिकवला धडा

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच अनेकांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केलंय. काही युजर्सने रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत 'हेल्मेट घातलं असतं तर कदाचित जीव वाचला असता' अशी प्रतिक्रिया दिलीये.

Road accident viral video
Viral Video: भर रस्त्यात रेड्याचा उच्छाद; स्कूटीस्वाराला हवेत उचलून आपटलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com