
पहलगाममध्ये भारतीय महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसलेला अपमानाचा बदला भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे घेतला. ६ आणि ७ मेच्या रात्री, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ले केले. मुझफ्फराबादपासून शकरगढपर्यंत नऊ ठिकाणच्या अड्ड्यांचा नाश झाला. सैन्याने स्पष्ट संदेश दिला, अन्यायावर न्याय मिळाला आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत आणखी महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका नेपाळी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाम भूमिका घेत भारताकडून प्रत्युत्तर दिले जाईल असे जाहीर केले. २९ एप्रिल रोजी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत, लष्कराला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. त्यानंतर भारताने लवकरच निर्णायक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्याच्या १५ दिवसांत भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. ६ आणि ७ मेच्या रात्री, पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर टार्गेट केलेली कारवाई करण्यात आली, जिथे दहशतवादी लपून बसले होते.
भारताने कसा प्रतिसाद दिला?
सुरुवातीच्या माहितीनुसार, 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ दहशतवादी ठिकाणांवर सुनियोजित क्षेपणास्त्र हल्ले केले. कारवाईदरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य न करता फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच निशाणा साधण्यात आला. भारताने संयम दाखवून प्रामुख्याने दहशतवादी पायाभूत सुविधांचा नाश करण्यावर भर दिला.
हे कसे उघड झाले?
लष्कराच्या सार्वजनिक माहिती विभागाच्या माजी एडीजीपी हँडलवरून ऑपरेशन सिंदूरचा खुलासा करण्यात आला. पहाटे १.२८ वाजता ६४ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट करत "प्रहारय सन्निहितः, जया प्रतिष्ठाः" म्हणजेच हल्ल्यास सज्ज आणि विजयासाठी प्रशिक्षित असल्याचा संदेश दिला गेला. १.५१ वाजता ऑपरेशन सिंदूरचे चित्र आणि "न्याय झाला आहे, जय हिंद" असे लिहून दुसरी पोस्ट आली. त्यानंतर PIBने प्राथमिक माहिती जाहीर केली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव का पडले?
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटन स्थळी गोळीबार केला. त्यांनी लोकांचा धर्म विचारून हिंदू पुरुषांना निवडले आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर गोळ्या घालून ठार केले. अनेक महिलांनी या हिंसाचारात पती गमावले, ज्यामध्ये काहींचे अलीकडेच लग्न झाले होते. आपल्या प्रियजनांच्या गमावलेल्या महिलांच्या सिंदूराचा सन्मान राखण्यासाठी भारताने प्रत्युत्तर दिले आणि या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे भावनिक नाव दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.