
जम्मू-काश्मीर : दहशतवादी हल्ल्याच्या काही सेकंदाआधीचा हा व्हिडीओ. अहमदाबादचे ऋषी भट झिपलाईनचा आनंद घेत सेल्फी व्हिडीओ काढत होते. मात्र खाली दहशतवाद्यांनी बंदूकीच्या जीवावर नंगानाच सुरु केला आणि बैसरन व्हॅलीत २६ निष्पापांच्या रक्ताचा सडा पडला. मात्र गोळ्यांचा आवाज येत असतानाही झिपलाईन ऑपरेटरने ऋषी भट थांबवलं नाही तर तसंच सोडून दिल्याचं दिसून येतंय.
या व्हिडीओतला आवाज शांतपणे ऐका...ऋषी भट झिपलाईनिंगसाठी निघणार तेवढ्यात पाठीमागे गोळ्यांचा आवाज येतोय. झिपलाईन ऑपरेटर अल्ला हू अकबर असं दोन तीन वेळा म्हणतोय, आणि गोळ्यांचा आवाज येत असताना ऑपरेटर मात्र ऋषी भट यांना सोडून देतोय.. त्यामुळेच झिपलाईन ऑपरेटर दहशतवाद्यांना मिळाल्याची शंका उपस्थित करत ऋषी भट यांनी आपबिती सांगितलीय.
झिपलाईनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एनआयएने तातडीने पावलं उचलत झिपलाईन ऑपरेटरला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मात्र झिपलाईन ऑपरेटर ऋषी भट्ट यांना सोडण्यापूर्वी अल्ला हू अकबर असं का म्हणत होता? त्याचं स्पष्टीकरण झिपलायन ऑपरेटरच्या बापाने दिलंय. हे असं असलं तरी झिपलाईन ऑपरेटरला दहशतवादी हल्ल्याची कल्पना होती का? गोळ्यांचा आवाज आल्यानंतरही त्याने ऋषी भट्ट यांना झिपलाईनवर का सोडलं? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.. त्यामुळेच आता एनआयएने झिपलाईन ऑपरेटरची चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करण्याची गरज आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.