
जम्मू-काश्मीर (पहलगाम) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण बघायला मिळतंय. या हल्ल्यादरम्यानचा पुन्हा एक धक्क्कादायक आणि थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हल्ला सुरू असताना नेमकं काय घडलं हे या व्हिडीओमधून स्पष्ट दिसतंय. पहलगामच्या हल्ल्यामध्ये २७ लोकांचा बळी गेला. हिंदूंना टार्गेट करण्यात आले आणि कुटुंबियांसमोरच धाड...धाड.... गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर तिन्ही सेना प्रमुखांची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली.
ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशी दौऱ्यावर होते. हल्ल्याबद्दल कळताच अमित शहा हे जम्मू काश्मीरला रवाना झाले आणि विदेशी दौरा अर्धवट सोडून मोदी भारतात परतले आणि त्यांनी विमानतळावरच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलिकडील शिक्षा देणारा असल्याचा थेट इशारा मोदींनी बिहारमधील भाषणात दिला.
आता पहलगाम हल्ल्यादरम्यानचा गोळीबाराचा व्हिडीओ पुढे आलाय. अहमदाबादचे रहिवासी ऋषि भट यांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ शूट झालाय. झिपलाईनचा अनुभव घेत असताना अचानक गोळीबाराला सुरूवात झाली. ऋषि भट हे झिपलाईन करताना व्हिडीओ शूट करत होते आणि खाली गोळीबार सुरू होता. या व्हिडीओमध्ये दहशतवादी हे पर्यटकांवर गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहेत. ऋषि भट यांनी म्हणाले की, 'ज्यावेळी झिपलाईनला मी सुरूवात करत होतो, त्यावेळी तो झिपलाईनवाला 'अल्लाह हू अकबर' तीन वेळा म्हणत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.