Pahalgam Attack: भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; PoK सोडून पळू लागले दहशतवादी

Pok Terrorist: दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आक्रमक झालाय. दहशतवाद्यांविरुद्ध बेधडक कारवाई सुरू केलीय. भारत लष्करी कारवाई करेल या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
Pok  Terrorist:
Pahalgam AttackSaam Tv
Published On

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरलीय. भारत सरकारने कठोर भूमिका घेत पाकिस्तानला कोंडीत पकडलंय. तर दुसरीकडे पहलगामध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवत जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जागोजागी छप्पेमारी करण्यात येत आहे. भारताची ही कारवाई पाहून पाकिस्तानात भीतीचं वातावरण पसरलंय. भारत मोठी लष्कर कारवाई करेल या भीतीने दहशतवादी पीओके सोडून पळू लागले आहेत.

भारत लष्करी कारवाई करेल अशी शक्यता असल्याने पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानने पीओकेमधील लाँच पॅडवरून दहशतवाद्यांना काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरुवात केलीय. यासोबतच बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद आणि मुनिरके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयातूनही दहशतवाद्यांना तेथून हटवलं जातंय.

Pok  Terrorist:
Pahalgam Attack: पाकिस्तानचे ४ तुकडे होणार; २०२५ नंतर जगाच्या नकाशावरून होणार गायब, भाजप खासदाराचा दावा

भारताने आतापर्यंत दोनदा स्ट्राइक करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. त्यामुळे भारत पुन्हा सर्जिकल किंवा एअर स्ट्राइक करेल ही भीती असल्याने पाकिस्तान तेथील दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय सुरक्षा एजन्सींनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वेळीही, पीओकेमध्ये एकूण ४२ दहशतवादी लाँच पॅड सक्रिय होते. तर १३० हून अधिक दहशतवादी तिथे राहत होते. या लाँच पॅडमधून दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवण्यात येत होते.

Pok  Terrorist:
Pahalgam Attack: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध पुकारा; केंद्रीय मंत्र्यांचं विधान

पहलगामवर हल्ला करणारे दहशतवादीही याच लाँच पॅडवरून भारतात घुसले होते. हे दहशतवादी लाँच पॅड पाकिस्तानी सैन्याच्या देखरेखीखाली काम करतात. ते त्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास मदत करतात आणि गरज पडल्यास भारतीय सुरक्षा दलांचे लक्ष विचलित करण्यासाठी गोळीबार देखील करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com