Deputy CM Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: नगरपरिषद निकालाच्या दिवशी शिंदेंचा धमाका, ठाकूरांच्या गडाला सुरूंग लावला; दिग्गज नेता ४०० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत

Deputy CM Eknath Shinde: पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडलं. बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली. या नेत्याने ४०० कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • नगरपरिषद निकालाच्या दिवशी पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप

  • बहुजन विकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

  • दिग्गज नेत्याने ४०० कार्यकर्त्यांसह धनुष्यबाण हाती घेतलं

  • एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला

नगरपरिषद- नगरपंचायत निवडणूक निकालाच्या दिवशीच पालघरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धमाका केला. एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या गडाला सुरूंग लावला. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे पालघरमध्ये शिवसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिला. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकुर यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक विमल पाटील आणि केशव पाटील यांनी पक्षाची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेतले.

शिवसेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चारशे कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीला माजी नगरसेवक सोडून जात असल्यामुळे ठाकूरांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

तर दुसरीकडे नवी मुंबईत एकनाथ शिंदे राजकीय धमाका करणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने नवी मुंबई शहरामध्ये राजकीय कंबर कसली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता यावी या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरलेले आहेत. पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे.

आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याचा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. याच मेळाव्यामध्ये विविध पक्षातील अनेक दिग्गज नेते, माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरांमध्ये शिवसेनेची राजकीय ताकद वाढताना दिसून येत आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महापालिकेत भरती! ९००० पदांसाठी घोषणा; कधी होणार प्रक्रिया?

Maharashtra Live News Update: नाशिकच्या आदिवासी विकास भवनामध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा ठिय्या

Eknath Shinde: '...ते एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते', राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Influencers Harassed in Mumbai: बिहारींनी लाज काढली! विदेशी क्रिएटरसोबत भररस्त्यात अश्लील कृत्य, मुंबई पोलिसांनी शिकवला धडा

IND vs ENG Semi final: सेमीफायनलआधी टीम इंडियाला इशारा, इंग्लंडचा खेळाडू म्हणतो वानखेडेवरील फॅन्सला शांत करू

SCROLL FOR NEXT