

मुंबई ते नवी मुंबईसाठी नवी मेट्रो लाइन
थेट मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार
स्थानके किती? वाचा सविस्तर
मुंबईकरांसाठीचा मेट्रोचा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे मेट्रो लाइन ८. मेट्रो लाइन ८ ला गोल्ड लाइन म्हणूनदेखील ओळखले जाते. ही मेट्रो लाइन मुंबईतील दोन्ही विमानतळांना जोडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनस (CSMIA)ते
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA)ला जोडणार आहे. आता एका विमानतळावरुन थेट दुसऱ्या विमानतळावर तुम्हाला मेट्रोने जाता येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने मेट्रो लाइन ८ हा मार्ग मंजुर केला होता. याचा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला. आता लवकरच या मेट्रो लाइनचे काम पूर्ण होईल. मेट्रोमुळे मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास अवघ्या काही मिनिटात होणार आहे.
मेट्रो लाइन ८ कधीपर्यंत सुरु होणार? (Metro Line 8 Launch Date)
मुंबई मेट्रो लाइन ८ बांधकाम लवकरच सुरु केले जाईल. २०२९ पर्यंत या मेट्रो लाइनचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. म्हणजेच पुढच्या ४ वर्षात मेट्रोचे काम पूर्ण होणार आहे.
किती वेळ वाचणार? (Mumbai To Navi Mumbai In Just 35 Minutes)
मेट्रो लाइन ८ चे पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना खूप फायदा होणार आहे. सध्या दोन्ही विमानतळांमधील अंतर पार करण्यासाठी ७०-१२० मिनिटांचा वेळ लागतो. हा प्रवास आता फक्त ३०-४५ मिनिटात पूर्ण होईल. म्हणजेच प्रवाशांचा जवळपास ४० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.याचसोबत प्रवासदेखील खूप सोपा, जलद आणि सुखकर होणार आहे.
मेट्रो लाइन ८ ची संपूर्ण माहिती (Metro Line 8 Joins Mumbai Airport to Navi Mumbai Airport)
मुंबई मेट्रो लाइन ८ ही ३४.८९ ते ४० किमी लांबीची असणार आहे. ही मेट्रो मुंबईवरुन थेट नवी मुंबईला जोडली जाणार आहे. दोन्ही विमानतळ परिसरात मेट्रोचे स्टेशन असणार आहे. तसेच यामध्ये भूमिगत मार्गदेखील आहे. सीएसएमआयए टर्मिलन २ ते चेंबुर छेडा नगरपर्यंतचा ९.२५ किमीचा मार्ग हा भूमिगत असणार आहे. यामध्ये एकूण सहा स्थानकेदेखील असणार आहे. त्यानंतर ही मार्गिका वाशी खाडी ओलांडून सायन पनवेल महामार्गाजवळून जाणार आहे. यानंतर नवी मुंबईतील नेरुळ, सीवूड्स, उलवेला जोडणार आहे. यानंतर शेवटी नवी मुंबई विमानतळ परिसरात पोहचले. या मेट्रो मार्गात २० स्थानके असणार आहे. त्यातील १४ स्थानके उन्नत तर ६ स्थानके भूमिगत असणार आहे. ११ स्थानके ही नवी मुंबईमध्ये असणार आहे.
मेट्रो लाइनची स्थानके (Navi Mumbai Metro Stations List)
CSMIA टर्मिलन २
मरोळ नाका
साकीनाका
पवई
कांजुरमार्ग
मुलुंड पूर्व
ऐरोली
घणसोली
कोपरखैरणे वाशी
मानखुर्द
वाशी
नेरुळ
बेलापूर सीबीडी
सीवूड्स
उलवे
एमएमआए टर्मिनल १ आणि टर्मिनल २
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.