Mumbai Metro 8: मुंबई, मानखुर्द ते पनवेल, 11 स्थानकं कोणती? कसा असेल मुंबई-नवी मुंबई जोडणारा मेट्रो ८ चा प्रोजेक्ट?

Mumbai Metro 8 Connect Navi Mumbai: मुंबई ते नवी मुंबई प्रवास आता जलद होणार आहे. तुम्ही मानखुर्दमार्गे पनवेलला जाणार आहे. यासाठी मेट्रो ८ प्रकल्प प्रस्तावित आहे. या मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
Mumbai Metro 8
Mumbai Metro 8Saam tv
Published On
Summary

मुंबई ते नवी मुंबईला मेट्रो जोडली जाणार

मेट्रो ८ च्या कामाला मंजुरी

मेट्रोच्या प्रोजेक्टमधील ११ स्थानके नवी मुंबईत

मानखुर्दमार्गे पनवेलला जाणार

आता मुंबई ते नवी मुंबई प्रवास आणखी सुसाट होणार आहे. आता मुंबईवरुन थेट पनवेल मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मेट्रो ८ च्या कॉमला परवानगी मिळाली आहे. आता नवीन मेट्रोमुळे तुम्हाला थेट नवी मुंबई विमानतळ गाठता येणार आहे. राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून मेट्रो लाइन ८ कोरिडोरचे काम सुरु केले आहेत. या प्रकल्पामुळे मेट्रोचं सलग नेटवर्क तयार होणार आहे.

Mumbai Metro 8
Vande Bharat Train : एका दिवसात राम लल्लाचं दर्शन घेऊन परतणं शक्य; आजपासून अयोध्या-दिल्लीसाठी वंदे भारत ट्रेन सुरू

मेट्रो ८ मधील ११ स्थानके ही नवी मुंबईत असणार आहेत. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर आता मार्ग ठरला आहे. मानखुर्दवरुन वाशी खाडी पूल ओलांडल्यानंतर मेट्रो सायन- पनवेल महामार्गावरुन धावणार आहे. यानंतर नेरुळ, सीवूड्स आणि उलवेमार्गे नळून एनएमआयएला जोडली जाणार आहे.

MMRDA च्या ३३७ किमी प्रादेशिक मेट्रो मास्टरप्लानचा भाग

राज्य सरकारने एमएमआरडीएच्या ३३७ किमीच्या प्रादेशिक मेट्रो मास्टर प्लानमध्ये मेट्रो ८ चा समावेश आहे. ही लाइन एमएमआरडीए आणि सिडको यांचा प्रकल्प आहे. आता ही मेट्रो लाइन पूर्णपणे पीपीपी मॉडेलद्वारे विकसित केली जाणार आहे.

Mumbai Metro 8
Metro New Line: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार, उद्घाटनाची तारीख ठरली, कोणत्या भागाला होणार सर्वाधिक फायदा?

नवी मुंबईमधील ११ स्थानके (Navi Mumbai Metro 11 Stations)

वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ सेक्टर १, नेरुळ, सीवूड्स, बेलापूर, सागर संगरम, तरघर, एनएमआयए वेस्ट, एनएमआयए टर्मिनल २ (विमानतळाच्या आत) अशी स्थानके असणार आहेत. शेवटची दोन स्थानके ही विमानतळ कॅम्पसमध्ये असणार आहे.

Mumbai Metro 8
Metro New Line: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार, उद्घाटनाची तारीख ठरली, कोणत्या भागाला होणार सर्वाधिक फायदा?

कसा असणार मार्ग? (Navi Mumbai Metro Line 8)

मेट्रो ८ चा मार्ग नवी मुंबईत प्रवेश केल्यानंतर सायन-पनवेल महामार्गाने पुढे वाशी, सानपाडा, जुईनगरमधून जाणार आहे. यानंतर ही लाइन नेरुळमधील एलपी जंक्शनमधून आतल्या बाजूला वळणार आहे. यानंतर डी. वाय पाटील विद्यापीठाजवळ एक स्थानक असणार आहे.

यानंतर ही मेट्रो लाइन नेरुळ, सीवूड्सच्या आतील भागातून जाणार आहे. यामध्ये सेव्हन वंडर्स पार्क स्टेशन असणार आहे.यानंतर अपोलो हॉस्पिटलमार्गे उलवे आणि एनएमएमसी मुख्य कार्यालयाकडे जाणार आहे.यानंतर सागर संगम आणि तारघर हे स्टेशन असणार आहे. यानंतर मेट्रो विमानतळ कॅम्पसमध्ये प्रवेश करेल. यानंतर शेवटी NMIA टर्मिनल 2 येथे थांबणार आहे.

Mumbai Metro 8
Pune Metro: २२ स्टेशन, पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आरामदायी प्रवास, मेट्रो ४ बाबत महत्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com