Kesari Patil Passed Away : पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ, 'केसरी टूर्स'चे संस्थापक केसरी पाटील यांचं निधन

Kesari Tours Founder Kesari Patil Passes Away : केसरी पाटील यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत बांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कर करण्यात येणार आहेत.
Kesari Patil Passed Away
Kesari Patil Passed AwaySaamTv
Published On

मुंबई : 'केसरी टूर्स'चे संस्थापक तथा अध्यक्ष केसरी पाटील याचं दु:खद निधन झालं आहे. आज पहाटे वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. केसरी पाटील यांनी वयाच्या ५०व्या वर्षी 'केसरी टूर्स'ची स्थापना करुन जगविख्यात कंपनी म्हणून उदयास आणली. त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून संबोधलं जायचं. केसरी पाटील यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत बांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कर करण्यात येणार आहेत.

पर्यटन क्षेत्रातील संधीची ओळख करून देणारा, महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा उद्यमी म्हणून उद्यमशील केसरी पाटील यांचे नाव सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'केसरी टूर्स'चे संस्थापक, अध्यक्ष केसरी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Kesari Patil Passed Away
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का बसणार

उद्योग-व्यवसायाच्या एखाद्या नव्या क्षेत्रात उतरून, त्यामध्ये नाव कमावून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची क्षमता केसरी पाटील यांनी आपल्या अंगी असलेल्या व्यवस्थापन आणि उद्मोजकतेच्या कौशल्याच्या जोरावर सिद्ध केली. 'केसरी टूर्स'च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेची ओळख जगभर पोहचवली.

या क्षेत्रातील रोजगार आणि व्यवसाय, व्यवस्थापन संधीची माहिती आणि अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. त्यांच्या निधनामुळे एका धडाडीच्या, उद्यमशील अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. केसरीभाऊ यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या केसरी समूहाशी निगडित सहृदयींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

Kesari Patil Passed Away
Maharashtra Politics: शिंदेंच्या दौऱ्याआधी ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोकणातील प्रमुख नेत्यांची हकालपट्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com