Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का बसणार

Uddhav Thackeray : कोकणात उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राजन साळवी यांच्यानंतर आणकी एक नाराज नेता साथ सोडण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Published On

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाकरेंना सर्वाधिक फटका कोकणात बसत आहे. राजन साळवी यांच्यासारखा खंदा कार्यकर्ता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाला. त्यानंतर आजाही अनेक माजी आमदार आणि नेते ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत जाणार आहेत. शिंदे सेनेचे दिग्गज नेते उदय सामंत यांनी कोकणात ऑपरेशन टायगर सुरू केलेय, त्यामध्ये आता ठाकरेंचा आणखी एक शिलेदार अडकल्याचे चित्र आहे. उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव यांचं कौतुक केले, त्यानंतर दुसऱ्याच तासांत भास्कर जाधवांची प्रतिक्रिया समोर आली, त्यामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले.

मागील काही दिवसांपासून भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात ठाकरेंना जोरदार धक्का बसला. ठाकरेंचा फक्त एकच आमदार कोकणात निवडून आला. भास्कर जाधव हे कोकणातून निवडून आलेले एकमेव आमदार होते. पण ते नाराज असल्याच्या राजकीय चर्चेने जोर धरला. त्यातच आता सामंत यांनी कौतुक केले.

Uddhav Thackeray
GBS : सांगलीत खळबळ, जीबीएसमुळे १४ वर्षांच्या मुलासह २ जणांचा मृत्यू

भास्कर जाधव काय म्हणाले ?

प्रसार माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चेला आणखी बळ आलेय. भास्कर जाधव म्हणाले की, मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, हे माझं दुर्दैव आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना शिबिरांमधून मला भाषण करण्याची संधी मिळायची. या पोराला महाराष्ट्रात फिरवा असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना म्हणायचे.

Uddhav Thackeray
MHADA : म्हाडा कार्यालयात पैशांचा पाऊस, आंदोलक महिलेने अधिकाऱ्याच्या दालनात उधळल्या नोटा

या पोराला महाराष्ट्रात फिरवा. आपल्यासोबत तळागळातील माणूस जोडला जाईल. या पोराला जर महाराष्ट्रात फिरवला तर तळागाळातला माणूस जोडला जाईल, असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनोजर जोशींना सांगायचे. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद मला लाभले, त्यानंतर पवार साहेबांचे आशीर्वाद मला लाभले. महाराष्ट्रात माझा एक वर्ग आहे, त्याचं समाधन आहेच. पण क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मला कधीही मिळाली नाही. माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवं आलं, असे भास्कर जाधव म्हणाले.

Uddhav Thackeray
Pune News : पुण्यातील बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, आर्थिक व्यवहारावर निर्बंध, हजारो लोकांना फटका

सामंत यांच्याकडून संकेत ?

भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ नेते आहेत. भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला फायदा होईल. ते आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर केला नाही, हे पक्षाचे दुर्दैव आहे, असे विधान करत उदय सामंत यांनी राजकीय चर्चेला सुरूवात केली. सामंत यांच्या विधानानंतर भास्कर जाधव ठाकरेंची शिवसेना सोडणार का? या राजकीय चर्चेने जोर धरला आहे.

Uddhav Thackeray
Eknath Shinde Video : उरलीसुरली ठाकरे सेना संपवून टाका; एकनाथ शिंदे कडाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com