

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी
मेट्रो ४ लाइन मार्ग लवकरच होणार सुरु
पुणे पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण कनेक्ट होणार
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईनंतर पुण्यातही मेट्रोचा विस्तार होत आहे. पुण्यातील सर्वात महत्त्वाची मेट्रो लाइन ४ आता लवकरच सुरु होणार आहे. यामुळे पुणे शहर कनेक्ट होणार आहे. मेट्रो लाइन ४ मुळे पूर्व ते पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम जोडले जाणार आहे. यामुळे तुम्ही अवघ्या काही मिनिटांत कुठेही जाऊ शकतात.
पुणे मेट्रो लाइन ४ मुळे खराडी, हडपसर, स्वारगेट, खडकवासला जोडले जाणार आहे. हा पुणे मेट्रो फेज २ चा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
रेल्वे ट्रान्सपोर्ट पोर्टलच्या माहितीनुसार, मेट्रोच्या तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. खडकवासला- खराडी कॉरिडॉरवरील प्रस्तावित स्थानके ही आसपासच्या भागांशी जोडली जाणार आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
पुणे मेट्रो फेज २ च्या कामाला मंजुरी
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पुणे मेट्रो फेज २ च्या कामाला मंजुरी दिली आहे. यामध्ये लाइन ४ (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मेट्रो 4A (नळ स्टॉप, वारजे- माणिक बाग) स्थानकांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कॉरिडोरला मिळून एक मेट्रो मार्गिका तयार होणार आहे. हा मार्ग ३१.६४ किमी लांब असणार आहे. यामध्ये २८ स्टेशन असणार आहे. पुण्याच्या मेट्रो लाइनसाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
मेट्रो लाइन ४ ची विशेषता (Metro Line 4)
मार्ग-खराडी- हडपसर- स्वारगेट-खडकवासला
लांबी-२५.५२ किमी
स्टेशन-२२
मेट्रो लाइन ४मुळे पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण जोडले जाणार आहे. यामध्ये खराडी आयटी हब, मगरपट्टा, हडपसर औद्योगिक क्षेत्र, स्वारगेट इंटरचेंज टर्मिनल,सिंहगड रोड आणि खडकवसाला रहिवासी क्षेत्र ही स्थानके असणार आहे.
मेट्रो 4A चा फायदा
मेट्रो फेज २ च्या कामानंतर पुणे मेट्रो नेटवर्क १०० किमीच्या आसपास असणार आहे. यामध्ये बिझनेस, आयटी, रहिवासी क्षेत्र जोडले जाणार आहे. यामुळे सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, शंकर शेठ रोड, सिंहगड रोड, कर्वे रोड, मुंबई बंगळुरु हायवेवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.