Fact Check: मोदींची इन्स्टावरून मन की बात? दर रविवारी मोदी युवकांशी संवाद साधणार?

Pm Modi Instagram Mann Ki Baat Fact Check : आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता पंतप्रधान मोदी दर रविवारी इन्स्टावरून मन की बात करणार असल्याचा दावा करण्यात आलाय...थेट तरुणांशी संवाद साधणार असल्याचा दावा मेसेजमध्ये केलाय...पण, खरंच मोदींनी असा निर्णय घेतलाय का...याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
PM MODI INSTAGRAM MANN KI BAAT VIRAL CLAIM FACT CHECK TRUTH
PM MODI INSTAGRAM MANN KI BAAT VIRAL CLAIM FACT CHECK TRUTHsaam tv
Published On

...मोदी आता दर रविवारी इन्स्टाग्रामवरून थेट तरुणांशी संवाद साधणार आहेत...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...दिल्लीतील आंदोलनानंतर मोदींनी रात्री इन्स्टावरून व्हिडिओ पोस्ट केला होता...त्यानंतर त्यांचे फॉलोअर्सही वाढले...त्यामुळे थेट तरुणांशी संवाद साधण्यासाठी दर रविवारी इन्स्टावरून मन की बात करणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच मोदींनी असा निर्णय घेतलाय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

पंतप्रधान मोदी देशातील तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी दर रविवारी रात्री 8 वाजता त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर लाईव्ह येतील. ...हा मेसेज व्हायरल होत असल्याने आता चर्चांना उधाण आलंय...काहींनी तर मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलंय...तर काहींनी जोरदार टीकाही केलीय...सोशल मीडियावरून चर्चा न करता थेट जनतेत येऊन संवाद साधायला हवा अशीही मागणी केलीय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? मोदी आता दर रविवारी युवकांशी इन्स्टावरून संवाद साधणार आहेत का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत आम्ही थेट सरकारकडूनच माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला...त्यावेळी याबाबत काही माहिती मिळाली...मग आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

मोदी दर रविवारी इन्स्टावरून मन की बात करणार नाहीत

पंतप्रधान मोदींनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही

सरकारकडूनही मोदींच्या व्हिडिओबाबत घोषणा नाही

सोशल मीडियावर फिरणारा हा दावा पूर्णपणे खोटा

सध्या देशात जेन झींची हवा आहे...सध्या कोणावरही टीका करताना रिल्स बनवले जातायत...चांगले, वाईट, कोणतेही मेसेज देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रिल्सचा वापर केला जातोय...काही दिवसांपूर्वी सलग 3 दिवस मोदींनीही इन्स्टावरून व्हिडिओ पोस्ट केला होता...त्यामुळे हा मेसेज व्हायरल करण्यात आला...पंतप्रधान मोदी 'मन की बात' सारख्या कार्यक्रमांद्वारे महिन्याच्या शेवटच्या रविवारी राष्ट्राशी संवाद साधतात...मात्र, आमच्या पडताळणीत मोदी आता दर रविवारी इन्स्टावरून मन की बात करणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...PIB ने लोकांना अशा खोट्या पोस्टवर विश्वास न ठेवण्याचा किंवा त्या शेअर न करण्याचा इशारा दिलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com