

शरद पवार गटातील माजी आमदार संदीप नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी भाजपने संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली.
संदीप नाईक यांच्या प्रवेशामुळे गणेश नाईकांची राजकीय ताकद वाढली आहे.
विकास मिरगणे, साम प्रतिनिधी
नवी मुंबईच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला भाजपनं मोठा धक्का देत माजी आमदाराला आपल्या गोटात खेचून आणलंय. माजी आमदार संदीप नाईक यांनी प्रवेश केलाय. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने कंबर कसलीय. त्यामुळे धडाधड नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेत आहे.
पुण्यातही शरद पवार यांच्या गटातील आमदाराच्या घरात फूट पाडत आमदार पुत्राला भाजपनं आपल्या गोटात खेचलंय. आता नवी मुंबईत माजी आमदार संदीप नाईक यांचा भाजप प्रवेश घडवून आणलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम पार पडला. हाती आलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये संदीप नाईक यांच्याकडे भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान संदीप नाईक यांच्या घरवापसीमुळं गणेश नाईकांची ताकद वाढलीय.
संदीप नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत राष्ट्रवादी शरद पवार गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला संदीप नाईक यांचा पराभव केला. संदीप नाईक आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बेलापूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर 5 महिन्यांनी बंडखोरी करणारे नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतले होते. मंदा म्हात्रेंच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना पक्षात घेणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आमदार संदीप नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले नवी मुंबई भाजपचे २८ माजी नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये आलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.