Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

Pune Corporation Election: पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या इनकमिंग एक्सप्रेसनं स्पीड पकडलाय. राजकीय पक्षांना एकामागून एक धक्के देत आहेत. मविआसह महायुतीमधील पक्षांनाही भाजप धक्के देत आहे. आता पुण्याचे माजी महापौरांना आपल्या गोटात भाजपनं खेचून आणलंय.
Pune Corporation Election
BJP leaders during a party event amid growing political entries in Pune.Saam tv
Published On
Summary
  • पुणे महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कामिंग सुरू आहे.

  • पुण्याचे माजी महापौर २२ डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

  • राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाला या पक्षप्रवेशांमुळे मोठा धक्का बसला आहे.

पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कामिंग सुरूच आहे. आता भाजपनं माजी पुण्याच्या माजी महापौरांना आपल्या गळला लावलाय. पुण्यात भाजपनं शरद पवार यांच्या गटाच्या आमदाराच्या घरात फूट पाडत मुलाला आपल्या गोटात खेचून आणलं. शरद पवार यांना धक्का दिल्यानंतर पुण्याचे माजी महापौरांनाही आपल्या गळाशी लावलाय. त्यामुळे पुण्यात भाजपची ताकद आणखी वाढलीय.

Pune Corporation Election
Maharashtra Politics: राजकारणात पुन्हा उलटफेर; अजित पवार 'ते' मंत्रिपद सोडणार? काय आहे कारण?

माजी महापौर यांचा २२ डिसेंबर रोजी मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. पुण्यातील एका राजकीय पक्षाचे शहराध्यक्ष सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत. इतकेच नाही तर पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भाजपमध्ये जाणार आहेत. ४ ते ५ माजी नगरसेवक देखील हाती कमळ घेणार आहेत.

Pune Corporation Election
Saam Maha Exit Poll: अकोटच्या पंचरंगी लढतीत भाजपची सरशी; पण ऐनवेळी वंचित करणार पॉलिटिकल गेम

शरद पवारांना पुण्यात मोठा धक्का

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना जबर धक्का दिला. शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे हे कमळ हाती घेणार आहेत. त्यामुळे पुण्यात भाजपची ताकद आणखी वाढलीय. सुरेंद्र पठारे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय.

शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांच्यासह दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायलीताई वांजळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेविका रोहिणीताई चिमटे, बाळासाहेब धनकवडे, विकास दांगट, नारायण गलांडे, प्रतिभाताई चोरगे, पायलताई तुपे, पदाधिकांऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसणार

भाजपचे आमदार महेश लांडगेंनी अजित पवार गटाच्याविरोधात चंग बांधला असून अजितदादांना आणखी एक धक्का देण्याची रणनीती आखलीय. आज अजित पवार गट आणि उद्धव ठाकरेंना धक्के देत २२ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यापुढंही धक्कातंत्र अवलंबले जाईल अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. यानंतर देखील महायुतीत गोडवा टिकून राहील असा दावा महेश लांडगे यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com