Saam Maha Exit Poll: अकोटच्या पंचरंगी लढतीत भाजपची सरशी; पण ऐनवेळी वंचित करणार पॉलिटिकल गेम

Saam Maha Exit Poll update : साम महा एक्झिट पोलमध्ये अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपची आघाडी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीला नराध्यक्षपद मिळवू शकते. जे उशिरा येणाऱ्या राजकीय वळणाचे संकेत देते.
Summary
  • अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळाली.

  • साम महा एक्झिट पोलनुसार भाजप सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

  • नगराध्यक्षपद वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अकोल्याच्या अकोटमध्ये झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळाली. येथे भाजपची सरशी होताना दिसत असली तरी नराध्यक्षपदी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार विराजमान होतील असा अंदाज साम टीव्हीनं केलेल्या सर्व्हेतून दिसत येत आहे. स्वाती चिखले ह्या वंचितच्या उमेदवार संभाव्य नगराध्यक्ष असतील अशा अदांज आहे. तर येथे भाजपची सत्ता येईल असा अंदाज एक्झिट पोलमधून दिसतोय.

येथे भाजप, काँग्रेस, एमआयएम,वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, त्यानंतर अजित पवार यांनी देखील येथे आपल्या उमेदवार दिला होता. मात्र अजित पवार यांच्या सभेचा काय परिणाम होईल हे पाहणं औत्सुक्यांच ठरेल. येथे महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती. कारण काँग्रेस आणि शिवसेनेनं आपले स्वतंत्र उमेदवार या निवडणुकीत उतरवले होते. त्याचाच फायदा भाजपला होताना दिसत आहे. येथील इतर पक्षांनी मुस्लीम उमेदवार उभे केले होते, त्यांच्या मतांची विभाजन होणार असून त्याचा फायदा भाजपला होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com