हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

Political Controversy Over Hockey India Jersey Decision 2026: भारतीय हॉकी संघाच्या पारंपरिक निळ्या जर्सीऐवजी भगव्या जर्सीचा निर्णय घेतल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया, टीका आणि समर्थन यामुळे क्रीडा क्षेत्रात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
Indian hockey team’s new saffron jersey sparks nationwide debate over identity and politics
Indian hockey team’s new saffron jersey sparks nationwide debate over identity and politicssaam tv
Published On

भारताची हॉकी टीम असो की क्रिकेटची... डोळ्यासमोर येते ती निळ्या रंगाची जर्सी...अनेक दशकांपासून भारतीय हॉकीची ओळख बनलेला हा निळा रंग आता बदललाय...हो तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल...पण 2026 च्या हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष आणि महिला हॉकीची टीम आता पारंपरिक निळ्या जर्सीऐवजी भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.....हॉकी इंडियाच्या या निर्णायामुळे नवा वाद उफाळून आलाय. काहींनी या बदलाचं स्वागत केलंय. तर काहींनी या निर्णय़ावर टीकेची झोड उठवलीय. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींनी जर्सीच्या रंग बदलण्यावरून थेट भाजप आणि RSSवर निशाणा साधलाय... तर हॉकी इंडियाच्या अध्यक्षांनी या निर्णयामागे अजब तर्क मांडलंय.

तर या निर्णयावर राजकारणीच नव्हे तर अनेक माजी खेळाडूंनीही आक्षेप नोंदवला असून निळी जर्सी कायम ठेवण्याची मागणी केलीय.

हॉकीच्या भगव्या जर्सीला विरोध

हॉकी इंडियानं हॉकी जगतासाठी अनेक चांगली कामं केली. मात्र जर्सीचा रंग बदलणं ही गोष्ट लाजीरवाणी आहे. भारतीय संघाचा वारसा आणि ओळख नेहमीच निळा रंग राहिलीय. मी अनेक वर्षं अभिमानानं निळी जर्सी घालून सामना खेळलोय. चाहत्यांना आपला भारतीय संघ निळ्या जर्सीत पाहायचा आहे. मग भगव्या रंगाची जर्सी कशासाठी?

2019 ला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट टीमनं इंग्लडविरोधातला सामना भगव्या आणि निळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेल्या जर्सीत खेळला होता...त्यावेळीही सरकार देशाचे 'भगवीकरण' करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता... तसाच आरोप आता हॉकी संघाच्या भगव्या जर्सीनंतर केला जातोय. त्यामुळे खेळाच्या आडून राजकीय अजेंडा राबवण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित केला जातोय. मात्र हॉकीच्या जर्सीचा रंग बदलण्यापेक्षा खेळाडूंना सुविधा आणि खेळाच्या गुणवत्तेत सुधारणा कधी होणार? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com