Pune Politics: पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, रमेश वांजळेंची बायको अन् मुलगी तर बापू पठारेंच्या मुलगा भाजपात

Maharashtra Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळेंची बायको आणि मुलगी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर आमदार बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पाठारे यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतलं.
Pune Politics: पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, रमेश वांजळेंची बायको अन् मुलगी तर बापू पठारेंच्या मुलगा भाजपात
Pune PoliticsSaam Tv
Published On

Summary:

  • पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली

  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या पक्षांना भाजपने मोठा धक्का दिला

  • रमेश वांजळे यांच्या पत्नी आणि मुलीने भाजपमध्ये प्रवेश केला

  • आमदार बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

सागर आव्हाड, पुणे

पुण्यात भाजपचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झालं आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस- शिवसेना ठाकरेसेनेला जोरदार धक्का दिला आहे. भाजपने दिग्गजांना आपल्या पक्षात घेत ऑपरेशन लोटस यशस्वी केलं आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल २२ जणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. २ दिवसांपूर्वीच या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी अमावस्य असल्याने हे प्रवेश दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. आजचा प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. त्यामुळे सर्वांनी भाजपचे कमळ हाती घेतले.

शरद पवाराच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राहुल कलाटे, वडगाव शेरीचे आमदार बापूर पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सायली वांजळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळा धनकवडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण गलांडे, सतिश लोंढे, खंडू लोंढे, प्रतिभा चोरगे आणि पायल तुपे या सर्वांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या सर्वांच्या पक्ष प्रवेशामुळे पुण्यात भाजपची ताकद चांगलीच वाढली.

Pune Politics: पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, रमेश वांजळेंची बायको अन् मुलगी तर बापू पठारेंच्या मुलगा भाजपात
Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

कोण आहेत सुरेंद्र पठारे?

सुरेंद्र पठारे ह्यांची सामाजिक आणि सार्वजनिक कार्याची दिशा ही सुरुवातीपासूनच विकासकेंद्री, राष्ट्रहितवादी आणि भाजपच्या विचारसरणीशी सुसंगत राहिलेली दिसून येते. व्यक्ती, पक्ष आणि पदांपेक्षा विचार आणि काम महत्त्वाचे मानत त्यांनी अनेक उपक्रम राबवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २०२२ साली शहराच्या शाश्वत विकासावर व्यापक विचारमंथन व्हावे, या हेतूने सुरेंद्र पठारे यांनी नगरविकास परिषद आयोजित केली होती. ही परिषद दोन सत्रांत पार पडली होती.

Pune Politics: पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, रमेश वांजळेंची बायको अन् मुलगी तर बापू पठारेंच्या मुलगा भाजपात
Maharashtra Politics: आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा|VIDEO

पूर्व पुण्याची ओळख असलेल्या वडगावशेरी मतदारसंघातील शहरी भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सुरेंद्र पठारे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. आरोग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती आणि युवक हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले आहेत. आरोग्य क्षेत्रात त्यांनी सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान महाशिबिराचे आयोजन केले जाते. कोरोना काळात ‘लसीकरण आपल्या दारी’ ही मोहीम राबवून ५३,००० पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आजही विविध मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिरे नियमितपणे सुरू आहेत.

Pune Politics: पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, रमेश वांजळेंची बायको अन् मुलगी तर बापू पठारेंच्या मुलगा भाजपात
Maharashtra Politics : नांदेडमध्ये महायुतीत धुसफूस! निवडणूक स्वबळावर लढण्याचा शिवसेनेच्या आमदाराचा भाजपाला कडक इशारा

हिंदू संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या भूमिकेतून त्यांनी पारंपरिक पद्धतीने संस्कृती यात्रा, गुढीपाडवा तसेच इतर सण-उत्सवांचे आयोजन केले. धार्मिकता, सामाजिक एकोप्याचा संदेश आणि सांस्कृतिक अस्मिता या मूल्यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. युवक हे राष्ट्राचे भवितव्य आहेत या विश्वासातून त्यांनी दरवर्षी SPF Sports Mania चे आयोजन करून स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. क्रीडा संस्कृती रुजवतानाच युवकांसाठी नोकरी मार्गदर्शन शिबिरे, करिअर काउन्सेलिंग आणि कौशल्य विकास उपक्रमही राबवले. एकूणच पाहता सुरेंद्र पठारे यांचे कार्य हे विकास, संस्कृती, आरोग्य, युवक आणि राष्ट्रहित यांचा समतोल साधणारे राहिले आहे. त्यांच्या विचारसरणीला सुसंगत अशा प्रवासाचा पुढचा टप्पा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

Pune Politics: पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, रमेश वांजळेंची बायको अन् मुलगी तर बापू पठारेंच्या मुलगा भाजपात
Maharashtra Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, पालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com