Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस २०२९ नंतर केंद्रात जाणार? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis Latest Marathi News : २०२९ नंतर केंद्रात जाण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले. पक्षाने सांगितले तर तयार असल्याचे ते म्हणाले.
Devendra fadnavis
Shedule caste Reservation Saam tv
Published On

devendra fadnavis on central government : देवेंद्र फडणवीस २०२९ च्या निवडणुकीवेळी केंद्रात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होते. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. फडणवीस यांचे राज्यातील राजकीय वजन वाढले, आता ते केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. २०२९ मध्ये पक्षाने केंद्रात जायला सांगितले तर जाऊ, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सकाळ वृत्तपत्र मुंबई आवृत्ती'च्या मुख्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

२०२९ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यावेळी राज्यातून प्रभावी राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातेय. महाराष्ट्राच्या बाहेरही देवेंद्र फडणवीस यांनी सभा गाजवल्या आहेत. त्यांचा वाढता प्रभाव पाहूनच केंद्रात ते जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पुढील ५ वर्षांत काय करणार आहेत? केंद्रात २०२९ मध्ये पंतप्रधान कोण राहणार? याबाबतची उत्तरे देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 'सकाळ वृत्तपत्र मुंबई आवृत्ती'च्या उद्घाटन कार्यक्रमावेळी त्यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिंदेंसोबतचे वाद, पुढची राजकीय दिशा, मराठा समाजाच्या रोषाचे उत्तर, बीएमसी निवडणुका अन् राज्याचा आर्थिक विकास याबाबत आपली मते स्पष्ट शब्दात केली.

Devendra fadnavis
Election : भाजप नेत्यावर पैसे वाटपाचा आरोप, ५०० च्या नोटा वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल

२०२९ मध्ये केंद्रात जाणार का?

सध्या सुरू असलेली टर्म मला खूप ट्रान्सफर्मेटिव्ह आणि शाश्वत करायची आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे लागेल. आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल, त्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. अनुभवी व्यक्ती म्हणून मी मुख्यमंत्रिपदावर बसलो आहे. माझ्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला कसा देता येईल, यासाठी माझे प्रयत्न आहेत. २०२९ पर्यंत मला पूर्ण क्षमतेने काम करायचे आहे. २०२९ नंतर पक्ष ठरवेल ती जबाबदारी मी घेईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra fadnavis
Accident : मध्यरात्री ट्रकला जोरदार धडक, बसने घेतला पेट, ३ जणांचा होरपळून जागीच मृत्यू, २५ गंभीर जखमी

केंद्रात जाण्याची पक्षाने संधी दिली तर काय कराल?

याबाबत मी अद्याप विचार केलेला नाही आणि आज करायचे कारण नाही. जे लोक खूप विचार करतात, प्लान करतात ते नेहमी त्याच जागी पाहायला मिळतात. राजकारणात काम करत राहावे. तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळते. प्रत्येक भूमिकेत तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. देशातील वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. मोदींजींसारखे पंतप्रधान लाभले आहेत. ४० वर्षांच्या व्यक्तीला लाजवेल अशी त्यांची कार्यक्षमता आहे. २०२९ नंतर मोदीच देशाचे पंतप्रधान राहतील. २०२९ नंतर तेच देशाचे नेतृत्व करतील, असे फडणवीस म्हणाले.

Devendra fadnavis
Accident : मध्यरात्री ट्रकला जोरदार धडक, बसने घेतला पेट, ३ जणांचा होरपळून जागीच मृत्यू, २५ गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com