Election : भाजप नेत्यावर पैसे वाटपाचा आरोप, ५०० च्या नोटा वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Local Body Election 2025 Live: चंद्रपूरच्या राजुरामध्ये भाजप नेते पांडुरंग चिल्लावार यांच्या हातून ५०० रूपयांच्या नोटा वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटपाचा आरोप होत असून काँग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी तक्रार दाखल केली आहे.
Maharashtra local body election Voting 2025
Maharashtra local body election Voting 2025Saam TV Marathi News
Published On

संजय तुमराम, चंद्रपूर प्रतिनिधी

Maharashtra local body election Voting 2025 : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान होत आहे. त्याआधी चंद्रपूरमध्ये पैसे वाटप केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ५०० रूपयांच्या नोटा दिल्या जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसतेय. भाजपच्या उमेदवाराकडून पैशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून कऱण्यात येत आहे. चंद्रपूरमधील राजुरामधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. उमेदवाराच्या घराच्या जवळच पैशांचे वाटप केले जात आहे.

चंद्रपूरमधील राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ चे भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. त्यांचे वडील आणि भाजप नेते पांडूरंग चिल्लावार हे निवडणूकीत ५०० रूपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा विडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत निवडणूक विभागाकडे काँग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी तक्रार केली आहे. अमोल चिल्लावार हे नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. चिल्लावार यांच्या घराच्या मागे असलेल्या पिठाच्या चक्कीच्या शेडमधून हे वाटप होत असल्याचा दावा केला जातोय.

Maharashtra local body election Voting 2025
शाहाच काढणार शिंदेंचा कोथळा, 'शिंदेंचे 35 आमदार फुटणार, राऊतांचा खळबळजनक दावा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये चिल्लावार यांच्या हातात पाचशे रूपयांच्या नोटांचा बंडल दिसत आहे. रक्कमेचे वाटप सुरू असल्याची तक्रार आली असल्याचे आणि ही तक्रार व व्हिडीओ आचारसंहिता प्रमुख यांचेकडे पाठवल्याचे राजुऱ्याचे तहसीलदार आणि नगर नगरपरिषद निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंड यांनी सांगितले. या प्रकारानंतर राजुरामध्ये खळबळ उडाली.

Maharashtra local body election Voting 2025
Maharashtra Nagar Parishad Live : अकलूजमध्ये तासभरापासून EVM बंद

पंढरपुरात 7 लाख रूपयांचा दारूसाठा जप्त

ऐन निवडणुकीच्या दिवशी पंढरपुरात पोलिसांनी सुमारे ७ लाख रूपयांचा देशी विदेशी दारू साठा जप्त केला. पंढरपूर तालुका पोलिसांनी आज पहाटे ही कारवाई केली. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी नाका बंदी केली आहे. नाकाबंदी दरम्यान एका कारगाडीतून दारूची वाहतूक केली जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra local body election Voting 2025
Rashi Bhavishya : या राशीसाठी मंगळवार ठरणार गेमचेंजर, वाचा कुणाला राहावे लागेल सावध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com