Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

nagar parishad nagar panchayat election Live Update News : राज्यात आज नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान होणार आहे. सर्व अपडेट एका क्लिकवर...
nagar parishad nagar panchayat election Live Update News
nagar parishad nagar panchayat election Live Update NewsSaam TV Marathi News
Published On

जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

साडे पाच वाजेपर्यंत झालेलं मतदान

अंबड: 76.08%

भोकरदन : 75.93%

परतुर : 70.32%

हिंगोली नगर परिषदेसाठी 66.25 तर कळमनुरीसाठी 72.81 टक्के सरासरी मतदान

हिंगोली जिल्ह्यातील पालिका निवडणुकांची अंतिम मतदानाची टक्केवारी

बदलापूर नगरपालिका निवडणुकीत 58.30 % मतदान

अकलूजमध्ये फेर मतदान घेण्याची मागणी

अकलूज नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सात मधील ईव्हीएम मशीन भाजप उमेदवाराच्या पतीने फोडल्याचा प्रकार समोर आहे .या नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार दिव्यांनी रास्ते निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रभागामध्ये फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात धाव घेवू असा इशारा ही रास्ते यांनी दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

नाशिकच्या येवला येथे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले. निवडणूक केंद्राच्या जवळच पैसे वाटप करत असल्याचा प्रकार समोर आलाय.

Chandrapur : चंद्रपुरात मतदाराने ईव्हीएम फोडले

चंद्रपूर : गडचांदूर येथे मतदानादरम्यान एका मतदाराने ईव्हीएम फोडले.. प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय येथील घटना,

राम दुर्गे असं evm फोडणाऱ्या मतदाराचे नाव, "नगारा" या चिन्हा समोरील बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागत असल्याचा ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचा आरोप,

पोलिसांनी राम दुर्गे याला घेतलं ताब्यात, नवीन ईव्हीएम लावून मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू

नंदुरबारमध्ये वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्राबाहेर मतदारांची प्रचंड गर्दी

नंदुरबार

वेळ संपल्यानंतर ही मतदान केंद्र बाहेर मतदारांची प्रचंड गर्दी...

नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये मतदारांची मोठी रांग....

मतदानाची वेळ संपून अर्धा तास उलटला तरी मतदान केंद्रात महिला आणि पुरुषांची गर्दी कायम....

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज...

गर्दी असलेल्या प्रभागांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त....

अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा...

अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी...

सायंकाळी 4 वाजेनंतर मोठ्या संख्येने मतदार पडले घराबाहेर...

साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावर पोहचलेल्या मतदारांनाच देण्यात आलाय प्रवेश...

मात्र अनेक ठिकाणी मतदारांची झालेली गर्दी, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे मतदान संथगतीने सुरू...

रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता...

सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे सेनेत बाचाबाची

सावंतवाडी मध्ये भाजप शिंदे सेनेत बाचावाची

शिंदे सेनेच्या बुथकडून गाडी वेगाने नेल्याचं शिंदे सेनेच म्हणण आहे.

शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपची गाडी अडवली, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मतदानल संपायला काही मिनिटे असताना घडला प्रकार

सावंतवाडी तणावपूर्ण वातावरण

विशाल परब यांच्या ताफ्यातील गाड्या अडवण्यात आल्या.

त्यांच्या सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की

Nagpur : नागपुरात लग्नसोहळा पार पडताच नवरीने केले मतदान

नागपूर :

लग्नसोहळा पार पडताच नवरीने केले मतदान

काटोल नगरपरिषद निवडणूक मध्ये भैरवी सतीशराव महाजन या नवरीने आपले मतदानाचे हक्क बजावला..

भैरवी आणि प्रभातचे लग्न सोहळ्याचा विधी पार पडताच... नवरीने मुलगी नवरीच्या पेहरावात मतदान केंद्रावर पोहचली....

आपला मतदानाचा अधिकार बजावला....

Nashik : मतदानला शेवटचे काही मिनिटे शिल्लक असताना मतदारांची धावपळ

नाशिक : भगूरमध्ये मतदानाला आता शेवटचे अवघे काही मिनिटे शिल्लक राहिल्याने शेवटच्या क्षणी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदारांची धावपळ पाहायला मिळाली.

जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ 

जळगावातील मुक्ताईनगरमध्ये गोंधळ

मुक्ताईनगरमधील मतदान केंद्रावर झाला वाद

मनमाड शहरात मोठा राडा, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले

मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये राडा

भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला राडा

दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना केली मारहाण

अचानक घडलेल्या या घटनेमुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये झाली पळापळ

बुलढाण्यात मतदान केंद्रावर राडा

बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील मतदान केंद्रावर पुन्हा राडा .

बोगस मतदान करताना चार जण पकडून दिल्याने झाला राडा ..

मतदान प्रतिनिधी यांनी दिला चोप ..

तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसाने केली मध्यस्थी ..

Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर नवरदेव नववधू मतदानासाठी

- नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर नवरदेव नववधू मतदानासाठी

- एकीकडे विवाह सोहळा चालू असताना वेळात वेळ काढून नववधू आपल्या नवरदेवाला घेऊन मतदान केंद्रावर

- त्र्यंबकेश्वर येथील आनंद पंचायती मतदान केंद्रावर नववधूने बजावला मतदानाचा अधिकार

- लोकशाहीसाठी त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी मतदानाला महत्त्व दिल्याची नवरीची प्रतिक्रिया

Nagpur : नागपूर जिल्ह्यात शेवटच्या क्षणी मतदारांची मोठी गर्दी

नागपूर जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 45.95% मतदान

रामटेक मधील जातीराम बर्वे शाळेत, मतदारांची मोठी गर्दी,

मतदान संपायला एक तास बाकी असतांना मोठी गर्दी

Washim : शेवटच्या टप्प्यात मंगरूळपीर येथील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी

वाशिम जिल्ह्यातील 3 नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडुकीसाठी मतदान पार पडत असून, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात 46.53 टक्के मतदान झालं होतं.

त्यानंतर मात्र मंगरूळपीर येथील अविनाश महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदारांनी प्रचंड गर्दी केल्याचं बघायला मिळालं

त्यामुळे आता मतदानाचा टक्का किती वाढतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Yevla : येवलात मतदान केंद्राबाहेर राडा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा

येवल्यातील प्रभाग क्रमांक प्रभाग नवीन 9 मधील सहस्रार्जुन मंगल कार्यालय या मतदान केंद्राबाहेर दोन्ही समर्थक आपसात भिडले.

मतदान केंद्रामध्ये ये जा करण्यावरून उमेदवार व समर्थक आपसात भिडले

Buldhana : बुलढाणा नगर परिषद निवडणूक बोगस मतदानाचा गोंधळ उघडं

बुलढाणा नगर परिषद निवडणुकीत आज मतदान प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

शहरात अनेक मतदान केंद्राबाहेर बोगस मतदानाचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे.

कार्यकर्त्यांनी काही बनावट मतदारांना पकडले खरे, पण ते पोलिसांच्या हातून निसटून गेल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे.

Maharashtra : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 ठिकाणी नगरपरिषद निवडणुका झाल्या, त्या 6 ठिकाणी स्ट्रॉंग रूम

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 ठिकाणी नगरपरिषद निवडणुका झाल्या त्या 6 ठिकाणी स्ट्रॉंग रूम

तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निगराणीखाली स्ट्रॉंग रूम असणार

नायब तहसीलदार, तहसीलदार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यांची स्ट्रॉंग रूम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार

स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेरे

प्रत्येक स्ट्रॉंग रूमला स्ट्रॉंग रूम अधिकाऱ्याला भेट देणे बंधनकारक असणार

प्रत्येक स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 20 पोलिसांचा 3 शिफ्ट मध्ये बंदोबस्त

विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर असणारा बंदोबस्त हा स्ट्रॉंग रूमला असणार

EVM: गडचांदुरात ईव्हीएम यंत्रात बिघाड

ईव्हीएम यंत्रात बिघाड आणि संथ मतदान गती यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेच्या जिल्हा परिषद शाळा, आदर्श हिंदी शाळा आदी तीन वेगवेगळ्या बुथवर मतदानादरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मतदान थांबल्याने मतदारांच्या रांगा लागल्या. कित्येक मतदार मतदानाच्या संथ गतीने कंटाळून परत गेल्याचे चित्र बघायला मिळाले. असे असले तरी दुपारनंतर मात्र महिला वर्गाचा मतदानाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. एक नगराध्यक्ष पद आणि वीस नगरसेवक पदांकरिता गडचांदुर शहरातील 25 हजार मतदार सकाळपासून मतदान केंद्रांवर उत्साहाने दाखल झाले आहेत. दुपारनंतर मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Vaijapur: वैजापूरात ३.३० वाजेपर्यंत मतदान

सकाळी 7:30 ते 03:30

1. पुरुष : 11302

2. स्त्री : 11738

3. एकूण : 23040

4. टक्केवारी : 54.42

Dhule: धुळ्यात ३.३० वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

धुळे मतदान टक्केवारी

शिरपूर वरवाडे नगरपरिषद - 52.2 %

पिंपळनेर नगर परिषद - 49.32 %

शिंदखेडा नगर पंचायत - 56.36 %

Parbhani: परभणीच्या सेलुतील मतदान केंद्रावर उमेदवार आणि पोलिसांत जोरदार वादावादी

परभणीच्या सेलूतील प्रभाग क्रमाक 8 मधील यशवंत विद्यालयात येथील मतदान केंद्र 8 वरील खोली क्रमाक 1 वर उमेदवार वारंवार येत असल्यामुळे पोलिस व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी मध्ये मोठा वाद झाल्याची घटना घडली आहे.सातत्याने उमेदवार मतदान केंद्राच्या आत येत असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली सेलूत अशा पद्धतीने वाद होण्याची ही दुसरी घटना आहे.

Jalna: जालन्यात दीड वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

जालना जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी

दुपारी दिडवाजेपर्यंत झालेलं मतदान

अंबड: 41.45%

भोकरदन : 39.82%

परतुर : 34.32%

Dharshiv: उमरगा शहरात शंभरी पार केलेल्या आजीने केले मतदान

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुण, ज्येष्ठ मंडळींसह 100 वर्षांवरील अनेक वयोवृद्ध व्यक्तींनी मतदान केंद्रावर धाव घेतली.प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे निवडणुकीपूर्वी सांगण्यात येते.यानुसार उमरगा शहरात राहणाऱ्या 100 वर्षाच्या आजीबाईनी आपला मतदानाचा अधिकार उमरगा शहरातील प्रभाग दोन मध्ये बजावला. अन्नपूर्णा विश्वनाथ स्वामी असे या 100 वर्षीय आजीबाईंचे नाव आहे.

Kolhapur Nagarparishad Election: कोल्हापूरमध्ये आतापर्यंत 45.90% मतदान

कोल्हापूर दि. 2 (जि. मा. का) : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायत मध्ये आज सकाळी 7.30 ते 1.30 वाजेपर्यंत 45.90 टक्के मतदान झाले. एकुण 318 मतदान केंद्रांवर 2,55,737 मतदारांपैकी 1,17,393 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 56916, महिला 60472 तर इतर 5 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

नगरपरिषद

जयसिंगपूर – 49747 पैकी 15512, 31.18%,

मुरगूड – 10128 पैकी 5538, 54.68%,

मलकापूर -4934 पैकी 2865, 58.07%

वडगाव - 23044 पैकी 12963, 56.25%

गडहिंग्लज-30161 पैकी 13380, 44.36%

कागल – 28753 पैकी 14457, 50.28%

पन्हाळा - 2967 पैकी 1626, 54.80%

कुरुंदवाड - 22224 पैकी 11671, 52.52%

हुपरी - 24802 पैकी 10210, 41.17%

शिरोळ - 24539 पैकी 11000, 44.83%

नगरपंचायत

आजरा -14686 पैकी 7673, 52.25%

चंदगड - 8315 पैकी 4528, 54.46%

हातकणंगले - 11437 पैकी 5970, 52.20%

Yavatmal: यवतमाळच्या दिग्रसमध्ये मतदारांची उसळली गर्दी

यवतमाळ जिल्ह्यात आज नऊ पालिका आणि एका नगरपंचायतीसाठी मतदान होताहेत.अशात दिग्रस शहरातील प्रभाग 11 मधील नगर परिषदेच्या उर्दू उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर पुरूषांसह महिलांनी मतदान करण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढ केलीये.एकीकडे जिल्ह्यात अडीच मतदानाचा टक्का 32 वर गेलेला नाहीये अशात दिग्रस पालिका निवडणुकीत सर्वात जास्त मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे वाढलेल्या मतदानचा टक्का कोणाला तारणार आणि कोणाला मारणार याची चर्चा सुरू आहे.

Beed: बीडच्या प्रभाग १६ मध्ये मतदान केंद्रासमोरच पैसे वाटप; VIDEO

बीड जिल्ह्यामध्ये सहा नगरपरिषदेच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडते मात्र बीड शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये चक्क मतदान केंद्र समोरच राष्ट्रवादी अजित पवार गट घड्याळाच्या उमेदवाराच्या नातेवाईकांनी मतदारांना पैसे वाटप करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Santosh Bangar: आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना आमदार संतोष बांगर

यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

फिर्यादी दिलीप चव्हाण

सहशिक्षक तथा केंद्र अध्यक्ष आरोपी

रोहित पवारांचा गंभीर आरोप

बुलढाण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पैसे वाटले

बुलढाणा शहरातील मिर्जा नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या उमेदवाराने पैसे वाटप केल्याचा आरोप इतर उमेदवारांनी केला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील डोंगरे उर्दू हायस्कुल मधील हा प्रकार समोर आला असून निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या उमेदवारान केली आहे.

Pune Election Voting : पुण्यात दुपारी दीडपर्यंत ३५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

पुणे जिल्ह्यात सकाळी ७.३० ते दुपारी १.३० पर्यंत ३५.६९ टक्के मतदान

सकाळच्या सत्रात पुणे जिल्ह्यातील वडगावमध्ये सर्वाधिक मतदान

वडगाव नगरपरिषदेसाठी ४६.१० टक्के मतदान

दौंडमध्ये सर्वात कमी २५.३८ टक्के

सासवड, मंचर, माळेगाव, भोरमध्ये सरासरी २० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

Bogus Voting : बोगस मतदान करताना ४-५ जणांना पकडले, बुलडाण्यात गोंधळ, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

बुलडाणा: काही भागांतील मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस मतदान करणाऱ्यांना पकडून दिला चोप

मतदान केंद्रांच्या परिसरात गोंधळ,

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

परभणीच्या जिंतूरमध्ये मतदानवेळी वादावादी

परभणीच्या जिंतूर नगरपरिषदेसाठी सुरू असलेल्या मतदान वेळी काही ठिकाणी वादावादी हाणामारीच्या घटना घडल्या. शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. मतदान केंद्रावर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जमले होते यावेळी किरकोळ कारणावरून हे दोन्ही गट आमने सामने आले.

छत्रपती संभाजीनगर : मतदान केंद्राबाहेर गोंधळ

खुलताबाद येथील मतदान केंद्रावर उमेदवार मतदाराला थेट मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात घेऊन जात होता, यावर इतर उमेदवारांनी तीव्र आक्षेप नोंदवला. काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवडणूक अधिकाऱ्यांवर दुजाभाव करत असल्याची तक्रार केली. मतदान केंद्राबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

Municipal Council Election Voting LIVE : भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने

पैसे वाटत असल्याच्या संशयावरून भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले. सावंतवाडी मतदारसंघात बूथवरच भाजपा कार्यकर्ते पैसे वाटप असल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

Beed Municipal Council Election Voting LIVE : गेवराईमध्ये पुन्हा पवार-पंडित आमने-सामने

गेवराई मध्ये पुन्हा पवार-पंडित आमने-सामने. आमदार विजयसिंह पंडित यांच्या पुतण्याला माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या पुतण्याला मारहाण.

Maharashtra Municipal Council Election Voting LIVE : निलंगा नगरपरिषदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली, आज निलंगा बंदची हाक, सकाळपासून शहरातील दुकाने बंद.

लातूरच्या निलंगा नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया ही पुढे ढकलल्याने, आज भाजप वगळता सर्वपक्षीय उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी निलंगा शहर बंदची हाक दिली आहे, जिल्ह्यातील इतर तीन नगरपरिषदेसाठी आज मतदान होऊ घातलं आहे,यामध्ये औसा ,अहमदपूर उदगीर या तीन नगरपरिषदेचा समावेश आहे, राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयीन अपील असल्याने, निलंगा नगरपरिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.येत्या 20 तारखेला निलंगा नगरपरिषदेचे मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढलाय, दरम्यान या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षासह इतर उमेदवारांनीही संताप व्यक्त केलाय., आज निलंगा शहर बंद ठेवत राज्य निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला आहे. दरम्यान भाजपची ताकद ही निवडणूक आयोग असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय

Election Voting live updates : निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया लांबवण्याची गरज नव्हती,निकाल लांबीवर पडल्याने ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचा निवडणूक आयोगावर रोष

नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी निवडणूक आयोगावर रोष व्यक्त केलाय. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया एवढी लांबवण्याची गरज नव्हती. लांबणीवर पडलेल्या निकालामुळे आचारसंहिता वाढले आणि विकासकामे खोळंबतील.18 दिवस उशिराने निकाल लागणार आहे.त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढवणार आहे.मात्र कोर्टाचा निर्णय असल्याने आपण त्याचा आदर करायला हवा असं आमदार कैलास पाटील म्हणाले.

 Karjat Nagar Palika Election Voting live updates : आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला संताप

कर्जत आणि खोपोलीत वारंवार वोटिंग मशीन बंद पडत आहे.बॅलेट युनिट बटण प्रेस होत नसल्याने निवडणूक आयोगाच्या या ढिसाळ कारभाराविषयी आमदार महेंद्र थोरवे यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि इतर मतदार यांना सोयी सुविधा नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

Badalapur Nagar Palika Voting live updates : बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर दोन गटात राडा

भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तुफान राडा

भाजप उमेदवार रमेश सोळसे त्यांच्या मुलाला मारहाण केल्यानंतर झाला राडा

पोलिसांनी घटनास्थळी दाखल लाठीचार्ज करत गर्दी पांगवली

प्रभाग क्रमांक 22 मध्ये मतदान केंद्राच्या बाहेर उभा असताना मुलाला मारहाण करत असल्याचा जाब विचारल्याने झाला राडा

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार निशा ठाकरे या ठिकाणी भाजप उमेदवारा विरुद्ध उमेदवारी लढत आहे

परिसरात तणावाचं वातावरण

बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

बार्शीतील एका गावात बोगस आधार कार्ड तयार करून मतदान केल्याचा गंभीर आरोप

बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत जामगाव (आ) येथील रहिवाशी असलेल्या व्यक्तीनी बोगस मतदान केल्याचा दिलीप सोपल यांचा आरोप

दिलीप सोपल यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात बोगस व्यक्तीनी मतदान केलेल्या व्यक्तीच्या नावासहित आरोप केलाय

दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आमदार दिलीप सोपल यांची मागणी

आज नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला - वडेट्टीवारांचा आरोप

राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. ओबीसीला २७ टक्के आरक्षण दिले हे सरकारला दाखवायचे होते, हे सरकार कोणत्या दिशेने काम करते? उद्याची मतमोजणी २१ डिसेंबरला गेली.

निवडणूक आयोग सरकारच्या हाताचे बाहुले झाले आहे, त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. राज्यात इतक्या निवडणुका झाल्या पण याआधी असे कधीच झाले नव्हते. यासाठी फडणवीस सरकार जबाबदार आहे, मतमोजणीत अडथळा येणे म्हणजे निवडणुका लांबणीवर टाकणं, पैश्याचा वापर करणं, खरंतर हा मत चोरीचा तर प्रकार नाही ना? निकाल बाजूने येणार नाही हे पाहून निवडणूक निकाल फिरवण्याचा प्रयत्न करत आहे का? लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.

पुसदमध्ये नाईक कुटूबियांचे मतदान

यवतमाळच्या पुसद नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्यमंत्री इंद्रणील नाईक त्यांच्या पत्नी व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिनी नाईक यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला. इंद्रनील नाईक यांचे वडील माजी मंत्री मनोहर नाईक व आई माजी नगराध्यक्ष अनिता नाईक या सर्वांनी मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. पुसदकरांनी नेहमीच नाईक कुटुंबावर विश्वास दाखविला आहे, येथे कोणता नाईक काम करतो हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे नगराध्यक्ष हा नाईक कुटुंबातला, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल अशी प्रतिक्रिया मंत्री इंद्रनील नाईक व मोहिनी नाईक यांनी दिली.

Sangli News :  जतमध्ये पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी 

सांगलीच्या जत नगर परिषदेच्या मतदाना दरम्यान गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते व पोलीस कर्मचाऱ्यां मध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे.जत मधल्या शिवाजी पेठेतील शाळा क्रमांक एक येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. भाजपाच्या प्रभाग 5 मधील महिला उमेदवार प्रणिता यादव यांना मतदान केंद्रा बाहेर काढण्यावरून महिला पोलीस कर्मचारी आणि यादव यांच्यामध्ये पहिल्यांदा वादावादी घडली.त्यानंतर यादव समर्थकांनी मतदान केंद्रामध्ये घुसत पोलिसांची उच्चत घातली,त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मध्ये यावेळी जोरदार वादावादीचा प्रकार घडला, दरम्यान पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी धाव घेत भाजपाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली,त्यामुळे या ठिकाणी काही काळ निर्माण झालेला तणाव निवळला.

Nanded Nagar Parishad Live : नांदेडमध्ये 19.95 टक्के मतदान

नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी साडेअकरा पर्यंत सरासरी 19.95 टक्के मतदान

देगलूर – 24.04%

बिलोली – 24.38%

कुंडलवाडी – 26.38%

उमरी – 13.30%

मुदखेड – 19.36%

भोकर – 17.75%

हिमायतनगर – 26.39%

किनवट – 15.51%

हदगाव – 13.50%

लोहा – 21.20%

कंधार – 17.60%

Maharashtra Nagar Parishad Live : बीडमध्ये निवडणुकीला हिंसक वळण, दोन गटात राडा अन् दगडफेक

बीडमधील गेवराईमध्ये निवडणुकीला हिंसक वळण लागलेय. दोन गटात जोरदार राडा अन् दगडफेक झाली. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर दगडफेक झाली.

भाजपा आमदार बूथच्या आत गेल्याने गदारोळ

पुलगाव येथील नगरपालिका निवडणुकीचे मतदान सुरु आहे. आमदार राजेश बकाने आपल्या कार्यकर्ता सह मतदान केंद्रावर जातं आहेत. 100 मिटरचा नियम असतानाही आमदार मतदान केंद्रात गेल्याने गदारोळ उडाला. मी लोकप्रतिनिधी आहे, जाऊ शकतो असं आमदारांने उत्तर दिले.

Maharashtra Nagar Parishad Live :  उद्याची मतमोजणी रद्द, आता २१ डिसेंबर रोजी लागणार निकाल

राज्यात अनेक ठिकाणी नगरपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सध्या मतदान सुरू आहे. आज ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत, त्याचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार होता. पण यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता, त्याबाबत नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी झाली. कोर्टाकडून नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा निकाल एकाचवेळी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता २१ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपंचायत, पंचायत समितीच्या मतमोजणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला.

बुलढाणा लढाणा नगर परिषद निवडणूक,   बोगस मतदानाचा गोंधळ

बुलढाणा नगर परिषद निवडणुकीत आज मतदान प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला.. शहरात अनेक मतदान केंद्राबाहेर बोगस मतदानाचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. कार्यकर्त्यांनी काही बनावट मतदारांना पकडले खरे, पण ते पोलिसांच्या हातून निसटून गेल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे.. शिवाय ग्रामीण भागातून ही बोगस मतदार येत असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार यांचेकडून होत आहे. . निवडणूक आयोग यावर काहीच कारवाई करत नसल्याचे ही आरोप होत आहे ..

वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सह पत्नी आपला मतदानाचा हक्क बजावला

भुसावळ येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयात मंत्री संजय सावकारे व पत्नी रजनी सावकार आहे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आज सकाळपासूनच भुसावळ शहरात मतदान साठी उत्साह बघायला मिळत आहे भुसावळ शहरात संजय सावकारे यांच्या पत्नी रंजना सावकारे हे नगराध्यक्षाच्या उमेदवार आहे भाजपा विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत आहे

बोगस मतदान झाल्याचा महिलेचा आरोप

बदलापूरच्या शिरवळ चौकात आणखी एक धक्कादायक प्रकार घडलाय. आपल्या नावाने दुसरीच महिला बोगस मतदान करून आल्याचा दावा एका महिलेनं केलाय. अनन्या परब असं या महिलेचं नाव आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या पतीचा आणि आपलं नाव मतदार यादीत होतं. मात्र मतदान करायला गेल्यानंतर तिथे मतदान अधिकाऱ्यांनी तुमच्या नावाने आधीच मतदान झाल्याचं सांगितलं. त्यामुळे आपल्या जागेवर नेमकं कोणी मतदान केलं असा सवाल अनन्या परब यांनी उपस्थित केलाय.

अकोटमध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा विरोधकांचा आरो

कोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधीमध्ये वाद झालेयेत. यात वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यानंतर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केलाय. अकोट शहरातील बसस्थानकासमोरच्या नगर परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्राबाहेर हा प्रकार घडलाय. इतर विरोधी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी भाजपाच्या बूथबाहेर पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलाय. याप्रकरणी अकोट शहर पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतलंय. दरम्यान, अकोटमध्ये प्रशासनाच्या आशीर्वादाने भाजपच्या लोकांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चंचल पितांबरवाले यांनी केला आहे. या वादाचा व्हिडिओ 'साम'च्या हाती लागलाय.

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी सकाळी ९.३० वाजेपर्यंत ८.५६ टक्के मतदान

पहिल्या दोन तासांत सर्वाधिक 13.35% त्र्यंबकेश्वर येथे तर सर्वात कमी मतदान 3.82% नांदगाव नगरपरिषदेत मतदान झाले.

karjat News : कर्जतमध्ये ४ ठिकाणी EVM मध्ये बिघाड

कर्जत नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मतदान 4 ठिकाणी मतदान केंद्रतील बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. बॅलेट युनिट बटन प्रेस होत नसल्याने कारणाने मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच एका ठिकाणी मशीन बंद असल्यामुळे अर्धा तास मतदारांना वाट पाहावी लागले.

Ahilyanagar : सत्यजीत तांबे यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सपत्नीक संगमनेर शहरात मतदानाचा हक्क बजावला.. सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे संगमनेर सेवा समिती या स्थानिक आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत.. संगमनेरमध्ये आमदार सत्यजीत तांबे आणि शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांची प्रतिष्ठा पणाला आहे..

Matheran News : माथेरान पाच लाखाची कॅश पकडली

माथेरान मध्ये पाच लाखाची कॅश शिवराष्ट्र पॅनलच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिली

माथेरान मध्ये शिंदे गटाची पाच लाख कॅश मतदान केंद्राच्या बाजूला ठेवण्यात आली होती

त्यावेळेला शिवराष्ट्र पॅनलच्या कार्यकर्त्यांना लक्षात येतात त्यांनी शिंदे गटाची आणलेली पाच लाखाचे कॅश पकडून देण्यात आली आहे

त्यावर निवडणूक आयोग आणि पोलिसांमध्ये माहिती घेण्याचं काम सुरू झाले आहे

अकलूजमध्ये मतदाना दरम्यान तणाव

अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षांमध्ये जोरदार लढत होत आहे या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाकडून मतदारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान या वेळी दोन्ही गटांमध्ये काही प्रमाणात तणाव असल्याचे पाहायला मिळत आहे अकलूज मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Manchar: मचंर येथे ७३ वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता आज जिल्ह्यात मतदान सुरु आहे; बिबट्याची दहशत असतांना अलका दोषी या ७३ वर्षीय आजीने न घाबरता मंचर नगरपंचायत प्रभाग ४ अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, लोंढेमळा या मतदान केंद्रावर सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला, देशाची लोकशाही बळकटीकरणाच्याकामी बिबट्याची दहशत बाळगण्याची गरज नाही, मतदारांनी पुढे येवून मतदान करावे, असे आवाहन अलका दोषी यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यात सकाळी ७.३० पासून ते ९.३० वाजेपर्यंत ८.३७ टक्के मतदान

पुणे जिल्ह्यात आज १५ नगर परिषदांच्या नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक

सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत सर्वाधिक ११.४९ टक्के मतदान मंचर मध्ये

सगळ्यात कमी मतदान ४.५७ टक्के मतदान शिरूर मध्ये

Maharashtra Nagar Parishad Live : नंदुरबार शहरात मतदानासाठी अपंग बांधवांचा उत्साह

अपंग बांधवांना सहजपणे मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक केंद्रावर विशेष व्यवस्था केली आहे. नंदुरबार शहरातील मतदान केंद्रांवर तैनात असलेले कर्मचारी तत्परतेने मदत करत आहेत. गरजूंना व्हीलचेअरवर बसवून मतदान कक्षापर्यंत नेले जात आहे, ज्यामुळे त्यांची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे. कर्मचाऱ्यांच्या या सहकार्यामुळे अपंग मतदारांना आपला लोकशाही हक्क बजावताना पाहायला मिळत आहे...

Maharashtra Nagar Parishad Live : अक्कलकोटमध्ये मतदार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद

अक्कलकोटमध्ये मतदार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद

अक्कलकोट मधील श्रीमंत राणी नित्मालाराजे कन्या प्रशालेत झाला वाद

मतदान झाल्यानंतर मतदान केंद्र परिसरात थांबाण्यावरून सुरु होता वाद

पोलीस संबंधित महिलेला मतदान केंद्रावरून बाहेर काढत असताना झाली वादाला सुरुवात

Maharashtra Nagar Parishad Live :  बुलढाण्यात 2 बोगस मतदार पकडले ! घाटाखालून 2 गाड्या भरून बोगस मतदार आल्याची माहिती

बुलढाणा नगरपालिका निवडणूकीसाठी आज 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे‌. अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता.मोताळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण आहे. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. दरम्यान घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस, पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Maharashtra Nagar Parishad Live : संतोष बांगरांवर कारवाई होणार? आयोगाकडून त्या व्हिडिओची चौकशी होणार

संतोष बांगरांच्या व्हिडिओ प्रकरणाचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांनी मागवला

गोपनीयतेचा भंग झाला असेल तर कार्यवाही होणार

निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

प्रभाग क्रमांक 12 मधील मतदान केंद्र क्रमांक 3 मध्ये आमदार संतोष बांगर यांच्या कडून गोपनीयतेचा भंग झाल्याच्या प्रकाराची चौकशी सुरू

गडचिरोलीत EVM मशीनमध्ये बिघड

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे मतदानात पार पाडत आहे आणि आज शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे बुथ क्रमांक 13 वर दोन तास मशीन मध्ये बिघड असल्यामुळे मतदान करताना मतदारांना त्रास सहन करावा लागलेला आहे त्यानिमित्त आमचे प्रतिनिधी गणेश शिंगाडे यांनी घेतलेला आढावा.

Maharashtra Nagar Parishad Live : बदलापूरमध्ये वातावरण तापलं, भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

मतदानाचा दिवशी भाजपा शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले !

बदलापूर पश्चिम गांधी नगर टेकडी एसटी बसस्टँड

जवळ भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

बदलापूर पोलिस घटनास्थळी दाखल, गर्दी पांगवला

महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारींनी बजावला मतदानाचा हक्क

बीड जिल्ह्यात सहा नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया पार पाडत असून अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी परळी नगरपरिषद निवडणूक होय या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांनी देखील आज सकाळीच आपल्या कुटुंबासह आंबेवेस भागातील बाळ संस्कार केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला.. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचा मोठा आव्हान आहे.. आणि परळीकरांनी परळीच्या विकासासाठी मतदान करावं असं आवाहन देखील पद्मश्री धर्माधिकारी यांनी मतदारांना केलं.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे मध्ये एकमेव "पिंक" मतदान केंद्र

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक आज पार पडतेय. या निमित्ताने तळेगाव दाभाडे मध्ये एकमेव असं पिंक मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पिंक मतदान केंद्र म्हणजे या केंद्रावर सगळे अधिकारी आणि कर्मचारी या महिला आहेत. गुलाबी रंगसंगतीमध्ये सजावट व फुलांची स्वागत कमान या मतदान केंद्रावर करण्यात आली होती.

बुलढाण्यात बोगस मतदानाचा उमेदवाराचा आरोप

बुलढाण्यात अनेक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातून बोगस मतदार आणून त्यांच्या करवी मतदार करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसच्या उमेदवार दत्ता काकास यांनी केला आहे. याला पुष्टी करणारे अनेक व्हिडिओही समाज माध्यमात व्हायरल होत आहेत. तर काही मतदारांना बोगस मतदान करताना पकडण्याची ही माहिती आरोप करते उमेदवारांनी दिली आहे.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूजमध्ये तासभरापासून EVM बंद

सोलापूरमधील अकलूज मतदान केंद्रावर गेल्या 50 मिनिटांपासून ईव्हीएम पडले बंद...

ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांच्या रांगाच रांगा थांबल्या...

आयोगाच्या वतीने तंत्रज्ञ आणि तज्ञांकडून ईव्हीएमची होत आहे तपासणी

जालन्यातील अंबड, भोकरदन आणि परतूरला 3 नगराध्यक्ष 65 नगरसेवकांसाठी आज मतदान.

जालन्यातील अंबड, भोकरदन आणि परतुर येथील नगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे अंबड, भोकरदन आणि परतूरला 3 नगराध्यक्ष 65 नगरसेवकांसाठी आज मतदान पार पडत आहे.नगराध्यक्ष पदासाठी 18 तर नगरसेवकांसाठी 237 उमेदवार रिंगणात आहे. तिन्ही ठिकाणी मिळून 98 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून 83640 मतदार बजावणार मतदानाचा हक्क बजावणार आहे .मतदान प्रक्रिया सुरळीत राबवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडनं देखील तगडा बंदोबस्त मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आलेला आहे..

आधी लगीन कोंढाण्याचं नवरदेवाने लग्नापूर्वी बजावला मतदानाचा हक्क...

आधी लगीन कोंढाण्याचं मग माझा रायबाचं,या उक्तीप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात एका नवरदेवाने लोकशाहीप्रती आपले कर्तव्य जपले. विवाहस्थळाकडे जाण्यापूर्वी त्याने थेट मतदान केंद्रावर हजेरी लावली आणि तळोदा नगरपरिषद निवडणुकीसाठी नवरदेव डॉ अनिकेत चौधरी यांनी तळोदा शहरातील मिशन हायस्कूलच्या बुतवर आपला मतदानाचा हक्क बजावला. सध्या नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसाठी तळोदा, शहादा, नवापूर आणि नंदुरबार या तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नवरदेवाने आपल्या लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवसालाही मतदानाच्या कर्तव्यापुढे दुय्यम स्थान देत इतरांनाही मतदानाचे महत्त्व पटवून दिले. त्याचा हा उत्साह निश्चितच कौतुकास्पद आहे.

खासदार धानोरकर यांनी केले मतदान

चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सकाळीच मतदान केले. वरोरा नगरपालिका निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वरोरा हे त्यांचे गाव असून, इथे काँग्रेसला विजयी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. आज शहरातील लोकमान्य विद्यालय केंद्रात जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

अकोल्यात मतदारांमध्ये मोठा गोंधळ. निवडणूक विभागाची अक्षम्य चुक

अकोला जिल्ह्यात नगरपालिका आणि नगर पंचायत मतदानाला सुरुवात झालीये. मात्र, अकोटमध्ये निवडणूक विभाग नगरपालिका प्रशासनाची अक्षम्य चूक समोर आलीये. निवडणूक विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने मतदारांना दिलेल्या 'वोटर स्लिप'मध्ये मतदानाची वेळ चक्क 10 वाजताची लिहिण्यात आलीये. राज्यभरात सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या दरम्यान मतदान होतंय. मात्र, असं असतांनाही निवडणूक विभागाने चक्क 10 वाजताची वेळ लिहित आपली अक्षम्य चूक समोर आलीये. प्रशासनाने दिलेल्या या 'वोटर स्लिप'मुळे मतदारांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेलाय.

येवल्यात बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीने बजावला मतदानाचा हक्क

अवघ्या काही तासांत विवाहसोहळा असतानाही लोकशाहीचा मान राखत नाशिकच्या येवला शहरातील नवरीने आज मतदानाचा हक्क बजावला. नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सकाळीच मतदान केंद्रावर उपस्थित होत या नवरीने आदर्श नागरिकत्वाचे उत्तम उदाहरण घालून दिले.

Maharashtra Nagar Parishad Live :  माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व पत्नी दुर्गा तांबे यांनी बजावला मतदानाचा हक्क

बीड शहरातील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मोठा गोंधळ

बीड शहरातील यशवंतराव नाट्यगृहातील बूथ क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 15 मधील ईव्हीएम मशीन 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा गोंधळ ईव्हीएम मध्ये एरर आल्याने बंद पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली जवळपास सकाळपासून दोन ते तीन मशीन बदलले आहेत वारंवार प्रॉब्लेम होत आहे मतदाना आम्हाला व्यवस्थित करता येत नाही लाईट गेल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद पडत आहेत अशी तक्रार मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनी बोलताना व्यक्त केली आहे.

मालेगाव नगर पंचायत निवडणुकीत ईव्हीएम बंद, मतदान प्रक्रियेला अडथळा

वाशिम च्या मालेगाव नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असताना नाना मुंदडा शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 10 मधील ईव्हीएम मशीन सकाळी 8 वाजताच्या दरम्यान अचानक बंद पडली. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना थांबण्याची वेळ आली आहे. मतदान केंद्रावर पर्याय व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Maharashtra Nagar Parishad Live : भंडाऱ्यात कुडकुडत्या थंडीतही मतदानाला उत्साहात प्रारंभ

भंडारा शहरासह तुमसर साकोली आणि पवनी नगरपालिका निवडणूक होत आहे या चार नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालेला आहे एकंदरीतच सकाळपासून थंडी असली तरी मतदार मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता प्रारंभ झालेला आहे एकंदरीतच भंडारा जिल्ह्यात काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजप नेते परीणय फुके, शिवसेनेचे नेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

Maharashtra Nagar Parishad Live : मतदानाच्या पार्श्वभूमीवर आष्ट्यात भानामतीचा प्रकार ! रस्त्यावर ठिकठिकाणी भंडारा आणि लिंबू टाकल्याचा प्रकार

सांगलीच्या आष्टा नगरपरिषदेची निवडणूक पार पडत आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टा शहरामध्ये भानामतीचा प्रकार समोर आला आहे.शहरात भंडारा आणि लिंबू ठिकठिकाणी टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.मतदानाच्या अवघ्या काही तासांपूर्वी शहरातल्या अनेक भागांमध्ये रस्त्यावर भंडारा आणि लिंबू टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.एका उमेदवाराकडूनच हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा आष्टा शहरामध्ये सुरू आहे,मात्र मतदानापूर्वी अशा पद्धतीने करण्यात आलेल्या घटनेमुळे आष्टा शहरात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Nagar Parishad Live : भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही मालवणात पैशांचे वाटप, माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप

एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला असून शिंदेचा पैशाच्या बॅगा आणतानाचा व्हिडीओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे आवाहनही वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे

लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क; पुलगावच्या नवरदेवाची चर्चा | Pulgaon Groom Votes

पुलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत एका नवरदेवाने लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 'बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवानं मतदान केलंय,' . या अनोख्या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे.

परभणीत जिल्ह्यातील 7 नगरपालिका निवडुकीसाठी आज मतदान

परभणी जिल्ह्यातील जिंतूर,सेलू मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, आणि पूर्णा या 7 नगरपालिकांसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहे जिल्ह्यातील 7 नगरपालिकासाठी 2लाख 49 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर 7 नगराध्यक्ष पदासाठी 31 उमेदवार आणि 165 नगरसेवक पदासाठी 500 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत सकाळी 7 वाजल्यापासून मतदानााला सर्वात झाली आहे कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त केंद्रावर तैनात केला आहे.

nagar parishad nagar panchayat election Live Update News :  संभाजीनगरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड नगर परिषदेसाठी नगरपरिषद मतदान केंद्रावरील खोली क्रमांक दोन मधील मशीनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदानाला विलंब होत आहे.

Maharashtra Nagar Parishad Live : रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू

रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिका विवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या दहा जागांसाठी 34 आणि नगरसेवक पदाच्या 209 जागांसाठी 575 उमेदवार रिंगणात आहेत. 2 लाख 37 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वच केंद्रांवर संथगतीने मतदानाला सुरुवात झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू

बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालीय. नगराध्यक्षपदासह 43 जागांसाठी हे मतदान होतंय. मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळीच मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळतय. मतदान शांततेत पार पाडाव यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून वीणा म्हात्रे, भाजपकडून रुचिता घोरपडे, ठाकरे गटाकडून प्रिया गवळी, अपक्ष संगीता चेंदवणकर आणि कडून आस्था मांजरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

वाडी नगरपरिषद येथील आदर्श नगर येथील मतदान केंद्रावर मॉक पोलदरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडली होती त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मशीन दुरुस्त करून मतदान सुरळीत सुरू झाले

बुलढाण्यात पैसे वाटप करताना रंगेहात पकडले, भरारी पथकाची कारवाई

खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 महेबुब नगर मधे मतदारांना पैसे वाटताना 50 हजाराची रोकड जप्त.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

पैसे वाटप करणारे संबंधित तीन व्यक्ती फरार

रोख रक्कम सोबत भाजपचे उमेदवार लक्ष्मण आयलाणी यांची डमी मतपत्रिका सुद्धा जप्त.

DHULE धुळे जिल्ह्यात मतदानाला सुरुवात

धुळे जिल्ह्यातील तीन नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील 2 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीसाठी 10 उमेदवार रिंगणात आहेत, नगरसेवक पदाच्या 67 जागांसाठी 207 उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.

1 लाख 8 हजार 816 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत, यासाठी 129 मतदान केंद्र सज्ज्य करण्यात आले आहे.

Pune Voting : जवळपास आठ वर्षानंतर आळंदीकरांनी बजावला मतदानाचा हक्क

आळंदी नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्या पासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. जवळपास आठ वर्षानंतर आळंदीकरांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आळंदीतील मतदारांमध्ये मोठ्या उत्साहाच वतावरण आहे. अगदी सकाळी साडे सात वाजेपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या 21 नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे.

Beed : बीड शहरातील पेठ बीड भागात रात्रीतून पैसे वाटप करत असल्याचा दोन तरुणांवर आरोप

नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान रात्रीतून दुचाकी घेऊन पैसे वाटप करत असलेल्याचा आरोप करत दोन व्यक्तींना बीड शहरातील पेठ बीड भागातील सोनार गल्लीत काही तरुणांनी पकडले. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. स्कुटीच्या डिक्कीत काही रक्कम आणि राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह असलेले काही पोस्टर देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

Dharashiv Nagar Parishad Live :  धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका साठी मतदान प्रक्रियेला सुरुवात

धारशिव जिल्ह्यातील शहरी भागातील मतदारांना आपल्या हक्काचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडीचा योग ४ वर्षांनंतर आला आहे.जिल्ह्यातील ८ नगरपालिकांत २८७ केंद्रात २ लाख ४३,६६७ मतदार मतदान करतील. नगराध्यक्ष व १८३ नगरसेवक निवडण्याची आज संधी असणार आहे. निवडणूक विभागाने यासाठी जय्यत तयारी केली असून, यासाठी १४३५ कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आमदार तानाजी सावंत,माजी मंत्री बसवराज पाटील यांच्यासह अनेक दिवसाच्या प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे.सकाळी साडेसात वाजता मतदान केंद्रावर मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात झाली

Maharashtra Nagar Parishad Live : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

नगरपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान होत असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केलेला पाहिला आपल्याला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड श्रीगोंदा आणि शेवगाव या तीन ठिकाणी नगरपालिकांसाठी निवडणूक होत असून तिन्ही ठिकाणी निवडणुकीत चांगलेच चुरस निर्माण झाली आहे जामखेड येथून मतदान केंद्र बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी

Jalana Nagar Parishad Live :  जालन्यातील अंबड, भोकरदन आणि परतूरला 3 नगराध्यक्ष 65 नगरसेवकांसाठी आज मतदान

जालन्यातील अंबड, भोकरदन आणि परतुर येथील नगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान मतदान होत आहे. तिन्ही ठिकाणच्या नगराध्यक्ष आणि 65 नगरसेवकांचे भवितव्य आज मतपेटी मध्ये बंद होणार आहे.जालन्यातील अंबड, भोकरदन आणि परतूरला 3 नगराध्यक्ष 65 नगरसेवकांसाठी आज मतदान पार पडत आहे.नगराध्यक्ष पदासाठी 18 तर नगरसेवकांसाठी 237 उमेदवार रिंगणात आहे. दरम्यान मागील काही दिवसापासून उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू होता या प्रचारानंतर आज या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला कोण बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

धुळे नगर परिषद व नगरपंचायत मतदान

धुळे नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे

जिल्ह्यातील 2 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीसाठी 10 उमेदवार रिंगणात

नगरसेवक पदाच्या 67 जागांसाठी 207 उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत

1 लाख 8 हजार 816 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार

129 मतदान केंद्र सज्ज्य

Maharashtra Nagar Parishad Live :

पुणे जिल्ह्यात नगरपरिषद नगरपंचायतीचे मतदान होत असताना मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यास त्या मतदान केंद्रावर तात्काळ पर्याय ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र पद्धत तयार करण्यात आलेला आहे यासाठी आठ कर्मचाऱ्यांची टीम ईव्हीएम मशीन घेऊन तैनात करण्यात आलेली आहे.

Pune Nagar Parishad Live : तळेगावमध्ये फक्त ४ प्रभागात मतदान

पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसाठी आज निवडणूक पार पडते आहे. यातील एक म्हणजे पुणे जिल्ह्यातलं तळेगाव दाभाडे नगरपरिषद. एकूण 27 प्रभागातील होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच 19 जणांची बिनविरोध निवड झाल्यामुळे उर्वरित पाच जागांवर निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्यामुळे आज तळेगाव दाभाडे येथील चार प्रभागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील बाल विकास महाविद्यालयात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान

आज राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यात आज १२ नगरपरिषदा 3 नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे.. सासवड नगरपरिषदेच्या २२ नगरसेवक तर १ नगराध्यक्ष पदासाठी आज मतदान होत आहे.मतदान ७ वाजता सुरू होईल.त्या अगोदर मतदान केंद्रावर तयारी करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन मतदान करून घेण्यासाठी सज्ज आहे.यावेळी सासवडमध्ये.महायुती मधील दोन नेत्यांमध्ये लढत होत आहे.पुरंदरचे आमदार माजी मंत्री विजय शिवतारे विरोधात पूर्वी काँग्रेस मध्ये असलेले आणि आता भाजपात गेलेले माजी संजय जगताप यांच्यात लढत आहे.काही महिन्यांपूर्वी संजय जगतात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे यावेळेस या ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे.या अगोदर ही सत्ता काँग्रेसकडे म्हणजे संजय जगताप यांच्याकडे होते.यावेळी हे दोन्ही नेते महायुती असले तरी स्थानिक निवडणुकीत समोरासमोर आहेत...

पुण्यात 524 मतदान केंद्रे, आज मतदान

पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायत, अध्यक्षपदाकरिता 76 उमेदवार आणि सदस्य पदाकरिता 955 उमेदवार यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायती मिळून एकूण 524 मतदान केंद्रे असतील.

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरिता पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झाली. जिल्ह्यात एकूण 13 ठिकाणी पिंक मतदान केंद्रे, जिथे मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी कर्मचारी या महिला आहे. सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, आदी अधिकारी, कर्मचारी तैनात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com