सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Sharad Pawar’s NCP as MLA Bapu Pathare’s Son Joins BJP : राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडताच भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जबरी धक्का दिलाय. पुण्यातील वडगावशेरीचे आमदार बापू पठारे यांचा मुलगा भाजपच्या गळाला लागलाय. आज बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांच्यासह २२ माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपात प्रवेश कऱणार आहेत. हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. पालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरी विधानसभेचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेवक बाळा धनकवडे, माजी नगरसेविका सायली वांजळे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातील २२ माजी नगरसेवक पदाधिकार्यांचा आज भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे.
पुण्यामध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी झाले आहे. २२ दिग्गज नेते एकाचवेळी भाजपात प्रवेश कऱणार आहेत. त्यामध्ये आमदारपुत्राचाही समावेश आहे. शुक्रवारी भाजपची पुण्यात महत्वाची बैठक पाडली. यामध्ये आज होणाऱ्या "मेगा प्रवेशा" बाबत चर्चा झाली. पुण्यातील विविध पक्षाचे अनेक माजी आजी नगरसेवक, पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश कऱणार आहेत. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित प्रवेश होणार आहे. पहिला टप्प्यात उद्या भाजपमध्ये अनेकांचे प्रवेश तर पुढच्या प्रवेशाची तारीख भाजपकडून लवकरच जाहीर होणार आहे.
भाजपच्या राज्याचे निवडणूक प्रमुख बावनकुळे यांच्या पुण्यातील भाजप आमदार, नेते, निवडणूक प्रमुख यांना सूचना दिल्या. पुणे महापालिकेत १२० पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा भाजपने निर्धार केला आहे. प्रभाग स्तरावर विविध कार्यक्रम, अनेक प्रकारचे मेळावे, निवडणूक प्रमुख यांची जबाबदारी, प्रभाग निहाय युनिट, टेक्निकल टीमची नेमणूक यासारख्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजप आणि शिवसेनेची एकत्र बैठक झाली. महापालिका निवडणूक ही महायुती म्हणून होईल युती नक्की झाली आहे. पुढच्या बैठकीत जागा आणि इतर विषयांवर चर्चा होईल. भाजपचे संख्याबळ पुणे शहरात निर्विवाद आहे. इलेक्टिव्ह मेरिटवर शिवसेनेला जागा दिल्या जातील आणि लवकरच या बैठका होतील. पुणे शहरात १२० पेक्षा अधिक जागा महापालिकेच्या सभागृहात पहायला नक्की मिळेल, असा विश्वास यावेळी पुणे शहराच्या भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.