Will Ajit Pawar Take Charge as Nandurbar Guardian Minister? : १९९५ च्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी आज त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यामुळे नंदुरबारचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडून काढून घेतले. त्यामुळे नंदुरबारचे पालकमंत्रिपद कुणाकडे जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार हे नंदुरबारच्या पालकमंत्रिपदाची धुरा आपल्याकडे घेतील, अशी चर्चा सुरू झाली. अजित पवार सध्या पुणे आणि बीडचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे नंदुरबारची धुरा ते स्वत:कडे घेणार का? की अन्य कुणाकडे जबाबदारी देणार, हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयीन आदेशामुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने नंदुरबारचे पालकमंत्री पद रिक्त झाले आहे. कोकाटे यांच्याकडील मंत्रालयीन खात्याचा पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यामुळे आता नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नंदुरबार जिल्ह्यात अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
गेल्या वर्षभरापासून हे पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडे आहे. कोकाटे यांनी गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्याचे दौरे करून विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या राजीनाम्यांनंतर आता जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. नंदुरबारमध्ये सध्या अशी चर्चा आहे की, जर जिल्ह्याचे पालकमंत्री पद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले तर गडचिरोलीप्रमाणेच नंदुरबारच्या विकासालाही मोठी गती मिळू शकते. नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वजनदार नेतृत्वाची गरज असल्याने राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी काळात सरकार यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.