Kolhapur double murder Case : आई आणि बापाला लेकाने शांत डोक्याने संपवल्याची अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरातून समोर आली आहे. महावीर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास मुलानेच आपल्या वृद्ध आई-वडिलांचा अत्यंत निघृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली. लेकाने आई-बापाला संपवले का? यामागे नेमकं कारण काय? याची चर्चा कोल्हापूरमध्ये सुरू आहे.
आई-बापाला संपवले अन् शांत डोक्याने मुलाने स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेत विजयमाला नारायण भोसले वय ७० आणि नारायण गणपतराव भोसले वय ७८ या वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा सुनील नारायण भोसले वय ४८ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास केला जात आहे. सुनीलचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे.
हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात आज पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संशयित सुनील भोसले याने अत्यंत शांत डोक्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आई विजयमाला भोसले यांच्या हातातील नस धारधार काचेच्या वस्तूने त्याने कापली. तसेच चेहऱ्यावर काचेच्या तुकड्याने वर्मी घाव घालण्यात आले. तर वडील नारायण भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार करण्यात आला.
या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयित सुनिल भोसले स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळी पुरावे संकलित करण्यात येत आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे. पोराने आईबापाला का कारले? याचा तपास कोल्हापूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.