

माधव सावरगावे, साम टीव्ही प्रतिनिधी
Sambhajinagar Hotel Rape Case: सांगलीमध्ये ८ वर्षाच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाने राज्यात संतापाचे वातावरण आहे. ही घटना ताजी असतानाच आता संभाजीनगरमधूनही भयंकर घटना झाल्याचे समोर आलेय. हॉटेलमध्ये तरूणीवर ३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला बियर पाजली, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तरूणी मित्रासोबत एका हॉटेलमध्ये गेली होती. मित्र झोपल्यानंतर फोनवर बोलायला बाहेर आली, पण त्याचवेळी हे कांड झाले.
हॉटेलमध्ये मित्रासोबत दारू पिऊन गॅलरीत फोनवर बोलणाऱ्या एका तरुणीवर तिघांनी दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापजनक स्थिती आहे.१७ डिसेंबर रोजी पहाटे ही घटना घडली.ऋषिकेश, घनश्याम आणि किरण अशी आरोपीची नावे आहेत.
तरूणी मित्राला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर दोघांनी हॉटेलच्या रूमध्ये मद्य प्राशन केले. मित्राला डोळा लागला. पण त्याचवेळी फोन आला म्हणून मुलगी हॉटेलच्या बाहेर आली. हॉटेलच्या खोलीबाहेर फोनवर बोलत असलेल्या तरुणीला त्याच मजल्यावरील दुसऱ्या खोलीतील तरुणांनी आणखी बिअर पाजून सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. ऋषिकेश, घनश्याम आणि किरण हे या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
१७ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजता रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या तरुणीने थेट वेदांतनगर ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत तिन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. पीडित तरुणी व तिचा मित्र खोली क्रमांक १०५ मध्ये थांबले होते. मित्र झोपल्यानंतर तरुणी थोडा वेळ खोलीबाहेर आली होती. परत खोलीत जाताना मात्र तिने १०५ ऐवजी चुकून खोली क्रमांक २०५ मध्ये प्रवेश केला. त्या खोलीत आरोपी ऋषिकेश, घनश्याम आणि किरण दारूचे सेवन करत होते. आपण चुकीच्या खोलीत आल्याचे लक्षात आल्याने तरुणी तत्काळ खोलीबाहेर गेली. मात्र एकाने बाहेर येत पुन्हा तिला खोलीत नेत बळजबरीने बिअर पाजली. यात तरुणीची शुद्ध हरपत गेली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हॉटेलमधून पलायन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.