भाजपचा डाव काँग्रेसच्या जिव्हारी, २ माजी आमदारांनी घेतलं कमळ, शेकडो समर्थकांनी सोडली साथ

Maharashtra Election Latest Marathi News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. हिंगोलीच्या प्रज्ञा सातव आणि सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Pradnya Satav
Pradnya SatavSaam TV Marathi
Published On

Congress leaders join BJP before civic polls : ऐन महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय. हिंगोली अन् सोलापूरमधील दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. हिंगोलीमधील काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव आणि सोलापूरमधील माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

प्रज्ञा सातव यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये हिंगोली येथील काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजीराव मस्के, जिल्हा प्रवक्ता तथा उपाध्यक्ष विलास गोरे, कळमनुरीचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा औंढा नागनाथ चे तालुकाध्यक्ष पंकज जाधव, खेर्डा गावचे सरपंच पंजाबराव गडदे, काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव चव्हाण आदींचा समावेश आहे.

दिलीप माने यांच्याबरोबर भाजपात पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये सोलापूरचे माजी नगरसेवक जयकुमार माने, नागेश ताकमोगे, दादाराव ताकमोगे, बाजार समितीचे संचालक प्रथमेश पाटील, माने बँकेचे संचालक आनंद देटे, काँग्रेसचे युवा अध्यक्ष पृथ्वीराज माने आदींचा समावेश आहे.

Pradnya Satav
Bandra-Worli sea link : २५० च्या स्पीडने पळवली लँबर्गिनी, मुंबईतील सी लिंकवरील व्हिडिओ

यावेळी चव्हाण म्हणाले की, प्रज्ञा सातव आणि दिलीप माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात चालू असलेल्या विकासाला हातभार लावण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाची बूज राखली जाईल. समस्यांची जाण असलेले उमदे व्यक्तिमत्व स्व. राजीव सातव आज आपल्यात नाहीत याबद्दल दु:ख व्यक्त करत राजीव सातव यांचा समाजकार्याचा वारसा त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव पुढे नेत आहेत याचा सार्थ अभिमान असल्याचे चव्हाण म्हणाले.

Pradnya Satav
Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

यावेळी प्रज्ञा सातव म्हणाल्या की, स्व.राजीव सातव यांनी हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. राजीव यांच्या विकासाचे अपूर्ण राहीलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या कार्यात साथ देण्यासाठी मी भाजपा मध्ये प्रवेश करत आहे. यावेळी दिलीप माने म्हणाले की, पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास आणि भाजपाची विचारसरणी यांनी प्रेरित होऊन माझ्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करत आहे. निष्ठेने काम करून भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न करेन असेही ते म्हणाले.

Pradnya Satav
पुन्हा संतोष देशमुखांसारखी हत्या, संभाजीनगरात माजी सरपंचाचा खून, ११ जणांनी लोखंडी रॉड अन् लाठ्या-काठ्यांनी मारले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com