पुन्हा संतोष देशमुखांसारखी हत्या, संभाजीनगरात माजी सरपंचाचा खून, ११ जणांनी लोखंडी रॉड अन् लाठ्या-काठ्यांनी मारले

former sarpanch murdered in Sambhajinagar : संभाजीनगरजवळील ओहर-जटवाडा गावात जमिनीच्या वादातून माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची ११ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड व लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून हत्या केली.
Sambhajinagar Former sarpanch killed
Sambhajinagar Former sarpanch killedSaam TV Marathi News
Published On

माधव सावरगावे, साम टीव्ही मराठी

Sambhajinagar Former sarpanch killed : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेला वर्ष झालेय, पण यासारख्या घटना अद्याप कमी झालेल्या नाहीत. संभाजीनगरमध्ये माजी सरपंचाला ११ जणांना संपवले. लोखंडी रॉड अन् लाठ्या-काठ्यांनी वार करत जीव घेतला. संभाजीनगरमधील ओहर जटवाडा या गावात ही धक्कादायक घटना घडली. ११ जणांनी माजी सरपंच दादा सांडू पठाण यांचा खून केला अन् तोडफोडही केली. या घटनेनंतर गावात तणाव वाढला. त्यामुळं पोलिसांचे विशेष पथक गावात तैणात करण्यात आलेय. माजी सरपंच दादा सांडू पठाण हत्या प्रकरणात हार्सूल ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकऱणी पोलिसांनी दोन जणांना अक केली आहे. जमिनीच्या वादातून माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलेय. (Sambhajinagar village violence news)

जमिनीच्या वादातून संभाजीनगर शहराजवळील ओहर-जटवाडा गावात ११ जणांच्या टोळक्याने काल सायंकाळी प्रचंड धुमाकूळ घातला. लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी हल्ला करीत त्यांनी माजी सरपंच दादा सांडू पठाण (६८) यांचा खून केला. तर, तिघे जखमी आहेत. हे टोळके आधी त्यांच्या घरावर चालून गेले होते. घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. आरोपींच्या दुकानाचीही तोडफोड करण्यात आली. ही माहिती मिळताच हर्सूल ठाणे व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात दंगा काबू पथकही तैनात केले आहे. याप्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Sambhajinagar Former sarpanch killed
Pune : मोठी बातमी! भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले, आयोगाची मोठी कारवाई

जमीर इनायतखाँ पठाण, मोईन इनायतखाँ पठाण, अफरोज गयाज पठाण, असलम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फूरकान अजगर पठाण, इम्रान मोईन पठाण, रामअवतार सागरमल साबू, हैदर गयाज पठाण, मोसीन मोईन पठाण, अशी आरोपींची नावे आहेत. यातील इम्रान मोईन पठाण, उमेर जमीर पठाण या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.

Sambhajinagar Former sarpanch killed
Pune : एकतर्फी प्रेमातून कांड, राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून, आरोपीला जन्मठेप

या प्रकरणी मृत दादा पठाण यांचा मुलगा आसिफ पठाण (३३) यांनी फिर्यादी दिली. ओहर गावातील गट क्रमांक १९८ मधील साडेचार एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून दोन कुटुंबांत २०२२ पासून वाद सुरू आहे. मृत दादा पठाण यांच्याकडे या जमिनीचा कायदेशीर ताबा असून महसूल दप्तरी तशा नोंदीही आहेत. असे असतानाही, या जमिनीवरून आरोपी हे दादा पठाण यांच्या कुटुंबीयांशी नेहमी वाद घालत होते. येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या अगदी बाजुला असलेल्या जागेवरून त्यांच्यात धुसफूस सुरु होती.

Sambhajinagar Former sarpanch killed
Buldhana : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! कॉलेजला जातानाच १९ वर्षाच्या ॠतूजाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com