संजय जाधव, बुलढाणार प्रतिनिधी
Buldhana Accident News Update : डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन कॉलेजमध्ये निघालेल्या १९ वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुलडाण्यात घडली आहे. ॠतूजा सावळे असं अपघातात निधन झालेल्या मुलीचं नाव आहे. ती डोंगरशेवली गावातील होती. मंगळवारी कॉलेजला जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. त्याचवेळी डोके बसला धडकले अन् ती खाली कोसळली. उपचारासाठी तिला तात्काळ रूग्णालयात दाखळ केले. पण डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले.
कॉलेजला जात असताना समोरून दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात ॠतूजा सावळे(१९ वर्ष, रा. डोंगरशेवली) या तरूणाचा अपघातात मृत्यू झाला. अपघाताची ही घटना बुलडाण्यातील डोंगरशेवली गावाजवळ घडली. ती बुलडाणा येथील राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवारी सकाळी ॠतूजा महाविद्यालयाला जात होती. त्यावेळी समोरून येणार्या दुचाकीने जोरात धडक दिली. त्यावेळी एका बाजूला जाण्याच्या प्रयत्नात तिचे डोके बसला धडकले अन् ती खाली कोसळली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. रस्त्यावर गर्दी जमली.
स्थानिकांनी अपघातानंतर तात्काळ धाव घेतली अन् ॠतूजाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ॠतूजाला मृत घोषीत केले. यामुळे संपूर्ण महाविद्यालय व डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली आहे. तिच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ॠतुजा एमबीबीएससाठी सुध्दा पात्र झाली होती. डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन ती दररोज कॉलेजला जात होती. पण काळाने घाला घातला अन् ॠतूजाचा मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.