CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

BJP candidate office attacked in Ambernath : अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञात इसमांनी चार राऊंड फायर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेआधी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.
Maharashtra Politics
Devendra FadnavisSaam Tv
Published On

अजय दुधाणे, साम टीव्ही प्रतिनिधी, अंबरनाथ

अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडीभाडा परिसरात मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली असून भाजपचे प्रभाग क्रमांक ४ क मधील उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींनी कार्यालयावर ४ राऊंड फायर गेल्या. या घटनेमुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात सुदैवाने कुणीही जखमी अथवा मृत झाल्याची नोंद नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अंबरनाथच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या उमेदवारासाठी देवेंद्र फडणवीस यांची आज जाहीर सभा होणार आहे. पण त्याआधीच उमेदवाराच्याच कार्यालयावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकऱणाची पोलिसांनी नोंद केली असून तपास केला जात आहे. गोळीबाराच्या घटनेने अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे, यामागे कोण असल्याची चर्चा होत आहे.

Maharashtra Politics
नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन अज्ञात इसमांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार करून घटनास्थळावरून पलायन केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे,घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Maharashtra Politics
Expressway Accident : मुंबई एक्सप्रेसवेवर भयानक अपघात, भल्या पहाटे पिकअपचा कोळसा, ३ जण जिवंत जळाले

तसेच डीसीपी, एसीपी आणि जॉईंट सीपी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.विशेष म्हणजे उद्या अंबरनाथमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असताना ही घटना घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या घटनेचा राजकीय व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने तपास केला जात असून पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस करत आहेत.

Maharashtra Politics
ZP Election Date : ४६ दिवस शिल्लक, जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणा कधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com