ZP School Jobs: तयारीला लागा! जिल्हा परिषद शाळेत ८००० शिक्षकांची भरती; निवडणुका संपताच नोटिफिकेशन निघणार

Zilla Parishad School Jobs Teacher Recruitment: जिल्हा परिषद शाळेत ८००० शिक्षकांसाठी भरती केली जाणार आहे. जवळपास १५ हजार जागा रिक्त आहेत. आता त्यातील ८ हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे.
ZP School Jobs
ZP School JobsSaam Tv
Published On
Summary

जिल्हा परिषद शाळेत शिक्षक भरती

८००० पदांसाठी होणार भरती

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका संपताच सुरु होणार प्रक्रिया

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची भरती केली जाणार आहे. सध्या शाळांमध्ये सुमारे १५ हजार १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के रिक्त पदे भरती केली जाणार आहे. शाळांमध्ये ८ हजार पदांसाठी भरतीचे नियोजन केले आहे.

ZP School Jobs
Railway Jobs: रेल्वेत १,२०,५७९ पदांसाठी भरती; मागच्या ११ वर्षात लाखो पदे भरली; वाचा सविस्तर

कधी होणार भरती? (ZP School Recruitment Date)

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची भरती केली जाणार आबे. फेब्रुवारी- मार्चपासून शिक्षक भरतीला सुरुवात होणार आहे.

सध्या २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षाची संतमान्यता अंतिम टप्प्यात आहे. यानंतर शासन निर्णयानुसार पटसंख्येअभावी अतिरिक्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही यासंदर्भात प्रश्न विचारले होते. याच पार्श्वभूमीवर आता शिक्षक भरती केली जाणार आहे.

जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती मिळवली जाणार आहे. आता टीईटी परीक्षेचा निकालदेखील लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका संपल्यावर रिक्त जागांवर भरतीसंबंधित जाहिराती काढल्या जातील. पवित्र पोर्टलवरुन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितले आहे.

ZP School Jobs
SBI Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय स्टेट बँकेत नोकरी अन् ४४ लाखांचं पॅकेज, ९९६ पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

जिल्हा परिषद शाळांची सध्याची स्थिती

राज्यात एकूण ६३००० जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. या शाळेत एकूण १.९८ लाख शिक्षक शिकवतात. त्यातील १५,१५८ पदे रिक्त आहेत. यातील ८० टक्के म्हणजेच ८००० पदांसाठी भरतीचे नियोजन केले जाणार आहे.

ZP School Jobs
LIC Jobs: सरकारी नोकरीची संधी; LIC मध्ये मिळणार १९ लाखांचं पॅकेज; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com