Maharashtra road accident news today : महाराष्ट्रासाठी गुरूवार अपघाताचा वार ठरलाय. पुणे, बुलडाणा,जालन्यासह राज्यभरात झालेल्या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यामध्ये चाकण तळेगाव मार्गावर झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय. तर जालना, बुलडाणा, कोकण अन् वर्ध्यातील अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय.
पुण्यातील चाकण तळेगाव मार्गावर महाळुंगे पोलीस स्टेशनजवळच रिक्षाचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. या रिक्षातून १२ जण प्रवास करत होते. पण अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृच्यू झाला. तर इतर सात ते आठ जण जखमी झाले. मृत्यु झालेले प्रवाशी कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील खरारवाडी परिसरात जवळपास चार-पाच चार चाकी वाहन एकमेकांना पाठीमागून धडकली आहेत. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मुंबईकडून पुण्याकडे जाताना खराडवाडी येथे ही वाहन एकमेकांना पाठीमागून धडकली आहेत. या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.
अकोट रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ एका दुचाकी स्वाराला कारने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील राहणार शकील हमजा देशमुख वय 50 हे लोहारा येथून शेगावकडे आपल्या मोटर सायकलने येत असतांना शेगाव ते अकोट रस्त्यावर नायरा पेट्रोल पंपाजवळ एका भरधाव इको कारने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते राजुर मार्गावर देळेगव्हाण शिवारात आज सकाळच्या सुमारास शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो आणि स्कुटीचा अपघात झालाय. या अपघातात स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर टेम्पोतील काही मजूर जखमी झाले आहे. शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचे भर धाव वेगात नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. नियंत्रण सुटल्यानंतर हा टेम्पो स्कुटी ला धडकला आणि त्यानंतर उलटला.दरम्यान घटनेची माहिती मिळताच नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातात जखमी झालेल्या शेत मजुरांना टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबईहून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.रस्त्याच्या कडेला संरक्षक म्हणून बांधलेल्या गर्डरवर अपघातग्रस्त ब्रेझा गाडी आदळली आणि तशीच काही फूट पुढे गेल्याने तुटलेला गर्डर गाडीचे इंजिन फोडून मागच्या सीटपर्यंत गेला. त्यात तो चालकाच्या मांडीत घुसल्याने चालक गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि जागीच ठार झाला. सलीम सुलतान खान असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. तो वसई, मुंबई येथील आहे. तर त्यांचा मित्र सुखविंदर संधू हा जखमी आहे..संधू याला उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कार भरधाव वेगात असल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.
वर्ध्यामधील आर्वी येथे भरधाव वेगातील ट्रकने सायकलला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये सायकल चालवणाऱ्या १४ वर्षाच्या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. ट्युशनला जात असताना मुलीचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.